आयपीएल 2023चा 22वा सामना मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळला जात आहे. उभय संघांतील हा सामना मुंबईच्या वानखडे स्टेडियमवर खेळला गेला. केकेआरसाठी एकही फलंदाज मोठी खेळी करू शकला नाही. पण तिसऱ्या क्रमांकावर आलेला वेंकटेश अय्यर मुंबई इंडियन्सविरुद्ध पुन्हा एकदा तुफानी खेळी करताना दिसला. त्याने अवघ्या 49 चेंडूत 5 चौकार आणि 9 षटकारांच्या मदतीने आपले शतक पूर्ण केले. या सामन्यात मारलेल्या षटकारांच्या जोरावर वेंकटेश एका खास यादीत नव्याने सामील झाला आहे.
आयपीएलमध्ये एका डावात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या भारतीयांच्या यादीत वेंकटेश अय्यर (Venkatesh Iyer) चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. आयपीएल सामन्यात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या भारतीयंमध्ये मुरली विजय (Murali Vijay) याचे नाव पहिल्या क्रमांकावर आहे, ज्याने एकाच डावात तब्बल 11 षठकार मारले होते. दुसऱ्या क्रमांकावर संजू सॅमसन आहे, ज्याने एकाच डावात 10 षटकार मारले होते. यादीत तिसरा क्रमांक श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याचा आहे. श्रेयस अय्यरने देखील एका डावात 10 षटकार मारले होते. वेंकटेश अय्यर या सामन्यात 9 षटकारांच्या जोरावर यादीत चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. वेंकटेशमुळे भारताचा माजी दिग्गज युवराज सिंग (Yuvraj Singh) चौथ्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर घसरला. युवराजने एका आयपीएल सामन्यात 9 षटकार मारले होते.
आयपीएल सामन्यात सर्वाधिक षटकार मारणारे भारतीय खेळाडू
11 – मुरली विजय
10 – संजू सॅमसन
10 – श्रेयस अय्यर
9 – वेंकटेश अय्यर*
9 – युवराज सिंग
9 – दिनेस कार्तिक
9 – रिषभ फंत
9 – हार्दिक पंड्या
9 – संजू सॅमसन
9 – रॉबीन अथप्पा
9 – ईशआन किशन
9 – ऋतुराज गायकवाड
वेंकटेशने या सामन्यात एकूण 51 चेंडू खेळले आणि 104 धावा करून विकेट गमावली. मर्यादित 20 षठकात केकेआरने 6 बाद 185 धावा केल्या. मुंबईसाठी कॅमरून ग्रीन, दूआन जेनसन, पीयुष चावला आणि रिले मेरिडीत यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली. ऋतिक शौकीनच्या हाताला दोन विकेट्स लागला. वेंकटेश अय्यर या सामन्याप्रमाणे मागच्या तीन सामन्यांमध्येही मुंबईविरुद्ध आक्रमक खेळी केली आहे. यापूर्वी मुंबईविरुद्ध खेळताना वेंकटेशने 53, 50*, 43 असे प्रदर्श केले होते. (Venkatesh Iyer breaks Yuvraj Singh’s record)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
तो काय म्हणाला? नितीश राणा-ऋतिक शौकीनचा वाद सोशल मीडियावर चर्चेचा विषय
BIG BREAKING: अखेर 3 वर्षांनंतर सचिनच्या अर्जुनचे आयपीएल पदार्पण! केकेआरविरूद्ध मिळाली प्लेइंग 11 मध्ये संधी