सध्या आयपीएलच्या चौदाव्या हंगामाची तयारी सुरू झाली आहे. यंदा राजस्थान रॉयल्स संघाचे फ्रेंचायजीने आपल्या संघाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथची सुट्टी करण्याच्या तयारी केली आहे. राजस्थान रॉयल्स संघाने आयपीएलच्या तेराव्या हंगामातील स्टीव्ह स्मिथ आणि त्याच्या नेतृत्वाचे मुल्यांकन केले आहे. त्यामुळे स्टीव्ह स्मिथची सुट्टी करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी चर्चा सध्या होत आहे.
आयपीएल 2020 मध्ये स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स संघाने 6 सामने जिंकले आहेत. त्याचबरोबर 8 सामन्यात पराभव झाला आहे. राजस्थान रॉयल्स हा संघ सलग तिसर्यांदा प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. त्यामुळे राजस्थान रॉयल्स संघाची नव्याने बांधणी करण्याची शक्यता आहे. स्टीव्ह स्मिथ 13 व्या हंगामात व्यक्तीगत प्रदर्शन आणि नेतृत्वात सुद्धा सपशेल अपयशी ठरला आहे. त्यामुळे संघातून हकालपट्टी होण्याची शक्यता आहे.
ईएसपीएन क्रिकइन्फोच्या माहितीनुसार स्टीव्ह स्मिथचा स्वत:चा फॉर्म सुद्धा या निर्णयाचे सर्वात प्रमुख कारण आहे. त्यामुळे पहिल्या हंगामातील विजेता संघ राजस्थान रॉयल्स नव्या रणनितीने उतरण्याच्या तयारीत आहे. कारण कर्णधार म्हणून सुद्धा स्टीव्ह स्मिथला आपली छाप सोडता आलेली नाही. मागील हंगामात 14 सामने खेळणाऱ्या 5 खेळाडूपैकी स्मिथ एक आहे. या हंगामाची सुरुवात राजस्थान रॉयल्स संघाने जोरदार केली होती. फ्लॉप होण्याअगोदर स्टीव्ह स्मिथने सलग दोन सामन्यात अर्धशतके केली होती. त्याने या हंगामात 25.91 च्या सरासरीने 311 धावा केल्या होत्या. ज्यामध्ये त्याच्या तीन अर्धशतकांचा समावेश होता.
राजस्थान रॉयल्स फ्रेंचायजीने 2019 मध्ये मध्यवर्ती हंगामात राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार म्हणून स्टीव्ह स्मिथची निवड केली होती. त्यापूर्वी राजस्थान रॉयल्स संघाचे नेतृत्व अजिंक्य रहाणेकडे होते. त्याच्या सुमार कामगिरीमुळे संघाचे नेतृत्व त्याच्याकडून काढून स्मिथला दिले होते. त्यांनंतर अजिंक्य रहाणेला या संघातून बाहेर करण्यात आले होते.
परंतू आता असे तर्क लावले जात आहे की, राजस्थान रॉयल्स स्टीव्ह स्मिथलाही बाहेर केल्यानंतर या संघाचे नेतृत्व संजू सॅमसनकडे दिले जावू शकते. या युवा यष्टीरक्षक फलंदाजाने मागील हंगामात राजस्थान रॉयल्स संघाकडून सर्वाधिक धावा केल्या होत्या. त्यामुळे राजस्थान रॉयल्स संघाची कमान त्याच्याकडे दिली जावू शकते. त्याने मागील हंगामात 13 सामने खेळताना 28.84 च्या सरासरीने सर्वात जास्त 375 धावा केल्या होत्या. ज्यामध्ये त्याने 3 अर्धशतके झळकावली होती.
तसेच राजस्थान रॉयल्स संघात इंग्लंड संघाचे दोन अनुभवी खेळाडू आहेत. बेन स्टोक्स आणि जोस बटलर परंतु हे दोघे आंतराष्ट्रीय सामन्यामुळे आयपीएलचा 14वा हंगाम पूर्ण खेळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे त्यांना संघाचे नेतृत्व सोपविण्याची शक्यता कमी आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
ज्यादा हो रहा हैं! बुमराह चौथ्या कसोटीतून बाहेर पडल्याच्या बातमीनंतर मिम्स व्हायरल
क्रिकेट इतिहासातील सर्वात कंजूस गोलंदाज, सलग २१ ओव्हर टाकल्या होत्या मेडन
अजिंक्य रहाणेने ‘ही’ चाल खेळली म्हणून टीम पेनवर आला दबाव, दिग्गजाने मांडले मत