भारतीय क्रिकेटपटू रिषभ पंत याने फलंदाजीबरोबर आपल्या यष्टीरक्षणानेही सध्या खूप वाहवाही लुटली आहे. त्याच्यामागोमाग आता इशान किशन हा सुद्धा फलंदाजीबरोबर आपले यष्टीरक्षण कौशल्य दाखवत आहे. श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी२० सामन्यात त्याला खालच्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवण्यात आले. त्यामुळे तो मोठी खेळी करू शकला नाही. परंतु आपल्या यष्टीरक्षणाने त्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे. हा सामना भारताने ३८ धावांनी जिंकला असून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. पुढील दुसरा टी२० सामना मंगळवारी (२७ जुलै) होणार आहे.
तर झाले असे की, श्रीलंकेचा संघ भारताच्या १६५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत होता. १७ व्या षटकापर्यंत ७ विकेट गमावत त्यांनी १२२ धावा केल्या होत्या. त्यामुळे विजयासाठी ४३ धावांची आवश्यकता होती. कर्णधार दसुन शनाका संघ सहकारी इसुरू उडाणासह संघाला विजयाजवळ पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील होता. अशात भारताचा कर्णधार शिखर धवनने पदार्पणवीर वरुण चक्रवर्तीच्या हाती चेंडू सोपवला.
चक्रवर्तीने अठराव्या षटकातील चौथा चेंडू कॅरम बॉल पद्धतीने टाकला. यावर कर्णधार शनाका शॉट मारायला गेला. परंतु त्याचा तोल घरसला आणि चेंडू त्याने मारलेला चेंडू यष्टीमागे उभा असलेल्या इशानने पकडला. तोल घसरल्यामुळे शनाकाचा खेळपट्टीवरील सीमारेषेवर असलेला पायही थोडा पुढे गेला होता. हाती आलेली ही संधी न दवडता इशानने क्षणभरात चेंडू यष्टीला लावला आणि शनाकाला यष्टीचीत केले.
https://twitter.com/im_maqbool/status/1419361352389255169?s=20
हे सर्व इतक्या वेगाने घडले की, अगदी पंचांनाही हा निर्णय घेणे अवघड गेले. इशानने चेंडू यष्टीला मारतेवेळी शनाकाचा पाय जमिनीवर होता की हवेत हा प्रश्न पंचांना पडला होता. त्यामुळे मोठ्या स्क्रीनवर याची पडताळणी करण्यात आली. यात स्पष्टपणे दिसून आले की, बरोबर शनाकाचा पाय जमिनीपासून वर गेल्यानंतर इशानने यष्टीला चेंडू मारला आणि मग पुन्हा शनाकाचा पाय जमिनीवर अर्थात सीमारेषेच्या आत पडला. त्यामुळे पंचांनीही त्याला यष्टीचीत घोषित केले.
That Ishan Kishan's stumping reminded me of Dhoni's stumping in IPL 2018 CSK vs DC match. He had stumped Colin Ingram and Shreyas Iyer in the same way
— Vipul Madkaikar (@vipul_madkaikar) July 25, 2021
What a stumping from Ishan Kishan
2nd Dhoni on Field
— A. (@Kohliaboveall) July 25, 2021
Ishan Kishan showing Dhoni levels in Stumping…That collect and clipping bails at crt time#IndvsSL #SLvsIND #IshanKishan#MSDhoni
— Geofinn_12 (@12Geofinn) July 25, 2021
इशानच्या या चपळ आणि गतीशील यष्टीरक्षणाने चाहत्यांना माजी यष्टीरक्षक एमएस धोनीची आठवण करुन दिली आहे. अनेकांनी सोशल मीडियाद्वारे त्याची धोनीशी तुलना केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-