भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर गावसकर कसोटी मालिकेची सुरुवात गुरुवारी (9 फेब्रुवारी) झाली. उभय संघांतील पहिला कसोटी सामना नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियवर खेळला जात आहे. पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी भारतीय संघाने अप्रतिम प्रदर्शन केले असले तरी, प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याची कमी चाहत्यांना जाणवत आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीत बुमराह संघात पुनरागमन करण्याची अपेक्षा होती, पण त्याच्या पुनरागमनाची प्रतिक्षा लांबण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) भारतासाठी कसोटी, वनडे आणि टी-20 फॉरमॅटमध्ये खेळत आला आहे. पण मागच्या वर्षभरात बुमराहाला वारंवार दुखापत झाल्याच्या बातम्या समोर आल्या. मागच्या काही महिन्यांपासून बुमराह एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळू शकला नाहीये. सध्या तो पाठिच्या दुखापतीमुळे एनसीएमध्ये सराव रिहॅब करत आहे. याच कारणास्तव ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या कसोटी सामन्यात देखील बुमराहन खेळत नाहीये. बीसीसीआयने पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी निवडलेल्या संघात सिराज सामील नसला, तरी शेवटच्या दोन सामन्यांमध्ये तो पुनरामन करणार असल्याचे बोलले जात होते. पण ताज्या माहितीनुसार बुमराह संपूर्ण बॉर्डर गावसकर ट्रॉफीतून माघार घेत आहे.
द टेलिग्राफच्या माहितीनुसार ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत बुमराहनला खेळवून संघ व्यवस्थापन जोखीम पत्करू इच्छित नाहीये. यावर्षी भारतीय संघाला मायदेशात आयोजित केला जाणार वनडे विश्वचषक खेळायचा आहे. वनडे विश्वचषकात बुमराह भारतासाठी महत्वाची भूमिका पार पाडू शकतो. माहितीनुसार कसोटी मालिकेनंतर खेळला जाणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत देखील बुमराहन खेळणार की नाही, याचा निर्णय अद्याप संघ व्यवस्थापनाने घेतला नाहीये. पुढच्या आढवड्यात याविषयी अंतिम निर्णय घेतला जाऊ शकतो. ऑस्ट्रेलिविरुद्धची वनडे मालिका 17 ते 22 मार्चदरम्यान खेळला जाईल.
विश्वसनीय सूत्रांच्या हवाल्याने टेलिग्राफने माहिती दिली की, “जसप्रीत बुमराह मागच्या कीह दिवसांपासून एनसीएमध्ये पूर्ण गोलंदाजी सत्रातून जात आहे आणि त्याने चांगले प्रदर्शन केले आहे. सराव सत्राच्या पुढच्या दिवशीही कसलाच तान नव्हता. ही गोष्ट त्याच्यासाठी सर्वात चांगली आहे.” माहितीनुसार एनसीएमध्ये बुमराह सध्या पाढर्या चेंडूने गोलंदाजीचा सराव करत आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या दोन कसोटी सामन्यात बुमराह खेळणार नाही, हे जवळपास पक्के झाले आहे. (Jasprit Bumrah may also ruled out of the last two Tests against Australia)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
नागपूर कसोटीच्या खेळपट्टीविषयी जडेजाची मोठी प्रतिक्रिया, ऑस्ट्रेलियन स्पिनर्सलाही दिला खास सल्ला
नागपूर कसोटीत ‘या’ खेळाडूला भारताचा एक्स-फॅक्टर मानतोय पाकिस्तानी दिग्गज, म्हणाला…