मुंबई । इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने पाकिस्तानविरुद्धच्या तिसर्या कसोटी सामन्यात 600 विकेट्स पूर्ण केले. 600 कसोटी विकेट घेणारा तो जगातील चौथा गोलंदाज आहे तर अशी कामगिरी करणारा तो पहिला वेगवान गोलंदाज आहे. त्याने पाहुण्या संघाचा कर्णधार अझर अलीला बाद करत कसोटी क्रिकेटमध्ये 600 विकेट्स पूर्ण केल्या.
श्रीलंकेच्या मुथिय्या मुरलीधरन (800), ऑस्ट्रेलियाच्या शेन वॉर्न (708) आणि भारताचा अनिल कुंबळे (619) हे गोलंदाज आता जेम्स अँडरसनच्या पुढे आहेत. हे तीनही खेळाडू फिरकी गोलंदाज होते.
वसीम अक्रम, विराट कोहली, इरफान पठाण, अनिल कुंबळे, जसप्रीत बुमराह यांच्यासह जगभरातील क्रिकेटपटूंनी अँडरसनचे अभिनंदन केले. अभिनंदन करणार्यांच्या या यादीमध्ये एक नाव केएल राहुल यांचेही आहे, ज्याने अभिनंदन करताना स्वत: ला ट्रोल केले आणि नंतर समजल्यानंतर त्याला ते ट्विट डिलीट करावे लागले.
वास्तविक, केएल राहुलने अँडरसनचे अभिनंदन करताना एक फोटो शेअर केला आहे, ज्यात अँडरसन गोलंदाजी करताना दिसत आहे आणि केएल राहुल नॉन स्ट्राइकवर उभा आहे. हा फोटो 2018 मध्ये भारताच्या इंग्लंड दौर्याचा आहे, जिथे इंग्लंडने भारताचा 4-1 असा पराभव केला होता. फोटो शेअर करताना राहुलने लिहिले की, “600 पैकी एक. जेम्स अँडरसनला या महान कामगिरीबद्दल अभिनंदन.!”
GOAT pic.twitter.com/gjfiXrrgaA
— K L Rahul (@klrahul) August 25, 2020
मात्र, त्यानंतर राहुलने हे ट्विट डिलीट केले आणि काही मिनिटांनंतर दुसरे ट्विट केले. पण तोपर्यंत त्याच्या ट्विटचा स्क्रीनशॉट व्हायरल झाला होता.