क्रिकेट रसिकांसाठी पवर्णी ठरलेले ‘बॉक्सिंग डे’ कसोटीचे तीन सामने झाल्यानंतर आयसीसीने ताजी कसोटी क्रमवारी जाहीर केली. या क्रमवारीत न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनला पाकिस्तानविरुद्ध खेळलेल्या शतकी खेळीचा मोठा फायदा झाला. या धुरंधरने विराट कोहली आणि स्टिव्ह स्मिथ या दिग्गजांना पछाडत अव्वल स्थान गाठले. या प्रशंसनीय यशानंतर विलियम्सनने त्याची प्रतिक्रिया दिली आहे. आयसीसीने विलियम्सनच्या प्रतिक्रियेचा व्हिडिओ शेअर केला आहे.
“कोहली आणि स्मिथ हे श्रेष्ठ खेळाडू आहेत आणि मी या खेळाडूंवर वरचढ ठरलो ही माझ्यासाठी आश्चर्याची गोष्ट होती. पण माझ्या या उपलब्धेबद्दल मी खूप खुष आहे. हे दोन्ही खेळाडू दरवर्षी क्रिकेटच्या तिन्ही स्वरुपात सर्वांच्या पुढे असतात. मला त्यांच्याविरुद्ध खेळण्याचे सौभाग्य लाभते, त्यामुळे मी स्वत:ला खूप भाग्यवान समजतो,” असे विलियम्सन म्हणाला.
💬 "It's about trying to do as much as you can for the team. If you can contribute as much as you can and it can be reflected on the rankings, that's really cool."
📽️ WATCH: The new World No.1 in Tests reacts to the latest ICC Rankings update 🙌 pic.twitter.com/qIAZTrPdTS
— ICC (@ICC) December 31, 2020
म्हणून विलियम्सन कसोटीतील फलंदाजी क्रमवारीत ठरला अव्वल
कोविड-१९ महामारीमुळे २०२० या वर्षात जास्त क्रिकेट सामने झाले नाहीत. परंतु जेवढे सामने खेळण्याची संधी मिळाली, तेवढ्या सामन्यात विलियम्सनने प्रभावी फलंदाजी केली आहे. या धाकड फलंदाजाने काही दिवसांपुर्वी वेस्ट इंडिज विरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यात २५२ धावांची द्विशतकी खेळी केली होती. याशिवाय नुकत्याच पाकिस्तान विरुद्ध झालेल्या बॉक्सिंग डे कसोटीत त्याने शतक ठोकले आहे. याउलट कोहली आणि स्मिथ हे ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर विशेष खेळी करू शकले नाहीत. त्यामुळे विलियम्सनने कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावणे स्वाभाविक होते.
We have a new No.1, folks!
⬆️ Kane Williamson rises to the top
⬆️ Ajinkya Rahane jumps to No.6Latest update in the @MRFWorldwide ICC Test Rankings 👉 https://t.co/OMjjVwOboH pic.twitter.com/rhmfe8jpUd
— ICC (@ICC) December 31, 2020
आयसीसीने जाहीर केलेल्या ताज्या कसोटी फलंदाजी क्रमवारीत विलियम्सनने १३ गुण कमावत पहिल्या स्थानी झेप घेतली आहे. कोहली आता या क्रमवारीत ८७९ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे, तर स्मिथची घसरण झाली असून तो ८७७ गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
जागतिक कसोटी क्रमवारी: मेलबर्न कसोटीतील शतकाने रहाणेला फायदा, तर ‘हा’ खेळाडू पोहोचला अव्वलस्थानी
जागतिक कसोटी क्रमवारीत चमकले बुमराह-अश्विन, टॉप-१० मध्ये मिळवलं स्थान
जागतिक कसोटी क्रमवारीत न्यूझीलंडची अव्वल स्थानी झेप, ‘या’ संघाला टाकले मागे