एखाद्या सामन्यात दोन प्रतिस्पर्धी संघांच्या खेळाडूंमध्ये छोटे-मोठे युद्ध झाल्याचे प्रसंग आपण बऱ्याचदा पाहिले आहेत. मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात दिल्ली येथे शनिवारी (१ मे) झालेल्या आयपीएल २०२१ च्या सत्ताविसाव्या सामन्यातही असेच काहीसे चित्र पाहायला मिळाले. चेन्नईचा गोलंदाज सॅम करन आणि मुंबईचा धाकड फलंदाज कायरन पोलार्ड हे भर सामन्यात एकमेकांना भिडताना दिसले.
त्याचे झाले असे की, चेन्नई संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ४ विकेट्स गमावत २१८ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना मुंबईने पावरप्लेमध्ये धमाकेदार फलंदाजी केली. परंतु सलामीला फलंदाजीला आलेला कर्णधार रोहित शर्मा बाद झाल्यानंतर मुंबईच्या तडखाफडखी विकेट्स पडल्या.
एका बाजूने विकेट्स जात असताना पोलार्ड स्फोटक खेळी करत एकाकी झुंज देत होता. १६ व्या षटकापर्यंत मुंबई संघ ३ बाद १६९ धावा असा स्थितीत होता. त्यापुढील षटक टाकण्यासाठी चेन्नईचा अष्टपैलू सॅम करन आला होता. त्याने षटकातील पहिलाच चेंडू १३२.१ किमी दर ताशी वेगाने टाकला. यावर पोलार्ड एकही धाव घेऊ शकला नाही. त्यापुढील दुसऱ्या चेंडूवर पोलार्डने कशीबशी एक धाव घेतली.
यानंतर पोलार्ड आणि सॅममध्ये छोटेशे शाब्दिक युद्ध झाल्याचे पाहायला मिळाले. दोघेही एकमेकांच्या डोळ्यात रागाने पाहात होते. यावेळी त्यांनी एकमेकांना काहीतरी म्हटलेदेखील होते. परंतु त्यांच्यातील वाद शाब्दिक चकमकीपर्यंतच मर्यादित राहिला.
What did you have for breakfast big man?
LIVE COMMS:
👉 https://t.co/uvQh3mWsdV 👈 #MIvCSK | #IPL2021 | #IPL | #CSKvMI pic.twitter.com/rXeRScxUiu— 🏏Flashscore Cricket Commentators (@FlashCric) May 1, 2021
gotta hand it to this man. What a run chase!! Loss like this is good to come early in the season gotta take the positives and move on. Sam Curran is a gem. Well Played Keiron Pollard. Well played Mumbai Indians. #CSKvsMI #IPL2021 pic.twitter.com/mmtHX9B8xv
— 1929hrs (@thebiggtunaa) May 1, 2021
याच षटकात सॅमने मुंबईचा अष्टपैलू कृणाल पंड्याला पायचित केले होते. यासह त्याने कृणाल आणि पोलार्डमधील ८९ धावांची भागिदारीही मोडली होती. परंतु तो पोलार्डती विकेट घेऊ शकला नाही. या सामन्यात सॅमने ४ षटकात ३४ धावा देत ३ विकेट्स चटकावल्या होत्या. तर पोलार्डने डावाखेर नाबाद राहत ८७ धावा चोपल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या-
बुमराहच्या गोलंदाजीला लागला सुरुंग, सीएसकेविरुद्ध केली आयपीएल कारकिर्दीतील सर्वात वाईट कामगिरी