भारतीय क्रिकेट संघाच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. संघाचा अनुभवी सलामीवीर फलंदाज केएल राहुल लवकरच मैदानात पुनरागमन करू शकतो. इंडियन प्रीमियर लीग 2023 दरम्यान राहुलला दुखापत झाली होती, ज्यातून तो अद्याप सावरला नाहीये. पण तो येत्या काळात लवकरच पुनरागमन करेल, असे संकेत त्याच्या एका सोशल मीडिया पोस्टमधून मिळत आहेत.
केएल राहुल (KL Rahul ) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) ही सलामीवीर जोडी एकदा खेळपट्टीवर टिकली, तर समोर गोलंदाजांचे आक्रमण कितीही आक्रमक असले, तरी हे दोघे परतवून लावू शकतात. मात्रा, मागच्या काही महिन्यांपासून रोहितला राहुलची साथ मिळाली नाहीये. राहुलच्या अनुपस्थितीत भारतासाठी शुबमन गिल डावाची सुरुवात करत आहे. पण चाहते राहुलच्या पुनरागमनाची वाट पाहत आहेत. चाहत्यांची ही इच्छा लवकरच पूर्ण होऊ शकते. राहुलने नुकत्याच शेअर केलेल्या पोस्टला कॅप्शन दिले की, “पुन्हा एकदा स्वतःसारखे जाणवू लागले आहे.”
राहुल या पोस्टमध्ये मैदानातील आऊटफिल्डवर विश्रांती घेत आहे. फोटो बेंगलोरच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीतील आहे, ज्याठिकाणी तो दुखापतीवर काम करत आहे. राहुलच्या या पोस्टवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडत आहेत. त्याच्या पुनरगामनासाठी अनेकांकडून प्रार्थना केली जात आहे. तर त्याच्यावर निशाणा साधणाऱ्यांची संख्या देखील मोठी आहे.
Starting to feel like me again 🏃♂️🏟️ pic.twitter.com/8cECI7oRDZ
— K L Rahul (@klrahul) July 11, 2023
केएल राहुलची आंतरराष्ट्रीय कारकीर्द –
2014 मध्ये भारतासाठी पदार्पण केलेल्या या सलामीवीर फलंदाजाने आतापर्यंत 47 कसोटी, 54 वनडे आणि 72 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यादरम्यान, राहुलने 81 डावांमध्ये 33.44च्या सरासरीने 2642 धावा केल्या आहेत. वनडे क्रिकेटमध्ये त्याने 45.13च्या सरासरीने 1986 धावा केल्या आहेत. तसेच टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने 37.75च्या सरासरीने आणि 139.12च्या स्ट्राईक रेटने 2265 धावा केल्या आहेत. राहुलने या तिन्ही फॉरमॅटमध्ये शतक ठोकले आहे आणि आतापर्यंत एकूण 14 आंतरराष्ट्रीय शतके केली आहेत. (KL Rahul may make a comeback to the Indian team soon)
महत्वाच्या बातम्या –
ICC Ranking । टॉप 10मध्ये हरमनप्रीने पुन्हा मिळवेल स्थान! ‘या’ आहेत सर्वोत्तम 5 फलंदाज
आता कसं होणार? भारत-वेस्ट इंडीज कसोटी पाहायची असेल तर जागून काढावी लागेल रात्र, अशी आहे वेळ