एक यष्टीरक्षक फलंदाज यष्टीमागे आणि यष्टीपुढे दोन्ही बाजूला त्याचे योगदान देत असतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षकांमध्ये गणल्या जाणाऱ्या एमएस धोनी, ऍडम गिलख्रिस्ट यांनी फलंदाजी आणि यष्टीरक्षण अशा दोन्ही विभागातही एकाहून एक जबरदस्त विक्रम नोंदवले आहेत. २० षटकांच्या इंडियन प्रीमियर लीगमध्येही यष्टीरक्षक, यष्टीरक्षणाबरोबर फलंदाजीमध्येही त्यांची कमाल दाखवताना दिसतात.
आयपीएल २०२०च्या हंगामाविषयी बोलायचं झालं तर, सध्या सहभागी झालेल्या एकूण ८ संघांपैकी ५ संघांचे यष्टीरक्षक फलंदाजीमध्ये शानदार प्रदर्शन करताना दिसत आहेत. आम्ही आतापर्यंत या हंगामात सर्वाधिक धावांनी नोंद करणाऱ्या यष्टीरक्षक फलंदाजांचा आढावा घेतला आहे. चला तर पाहूया…
आयपीएल २०२०मध्ये आतापर्यंत सर्वाधिक धावा करणारे यष्टीरक्षक
केएल राहुल
किंग्स इलेव्हन पंजाबचा कर्णधार आणि यष्टीरक्षक केएल राहुल याने आतापर्यंत आयपीएलच्या तेराव्या हंगामात सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याने केवळ ३ सामन्यात २२२ धावा ठोकल्या आहेत. यात त्याच्या एका शतकाचा आणि एका अर्धशतकाचा समावेख आहे. दरम्यान त्याने २३ चौकार आणि ९ षटकार ठोकले आहेत. तर यष्टीमागेही त्याने ४ फलंदाजांना बाद केले आहे.
संजू सॅमसन
राजस्थान रॉयल्स संघाचा २५ वर्षीय यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनने आतापर्यंत २ सामने खेळले आहेत. त्यात त्याने २ अर्धशतकांच्या मदतीने १५९ धावा केल्या आहेत. यात त्याच्या १६ षटकार आणि ५ चौकारांचा समावेश आहे. तसेच त्याने यष्टीमागे आतापर्यंत ८ फलंदाजांना आपला शिकार बनवले आहे.
एबी डिविलियर्स
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा एबी डिविलियर्स याने आतापर्यंत आयपीएल २०२०मध्ये ३ सामने खेळत १३४ धावा केल्या आहेत. यात त्याच्या २ अर्धशतकांचा समावेश आहे. सोबतच त्याने १२ चौकार आणि ७ षटकार जडले आहेत. तर यष्टीमागे त्याने आतापर्यंत २ विकेट्स घेतल्या आहेत.
रिषभ पंत
दिल्ली कॅपिटल्स संघाचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत याने आतापर्यंत आयपीएलच्या तेराव्या हंगामात ३ सामने खेळत ९६ धावा केल्या आहेत. दरम्यान त्याने २ षटकार आणि १० चौकार ठोकले आहेत. सोबतच त्याने यष्टीमागे ६ फलंदाजांना बाद करत तंबूचा रस्ता दाखवला आहे.
इशान किशन
मुंबई इंडियन्स संघाचा यष्टीरक्षक फलंदाज इशान किशन याने या हंगामात आतापर्यंत एक सामना खेळला आहे. या एकमेव सामन्यात त्याने ९९ धावांची तूफानी खेळी केली आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध झालेल्या आयपीएल २०२०च्या दहाव्या सामन्यात त्याने ५८ चेंडूत २ चौकार आणि ९ षटकार ठोकत हा कारनामा केला होता. पण दुर्दैवाने मुंबईने तो सामना सुपर ओव्हरमध्ये गमावला.
ट्रेंडिंग लेख-
आयपीएल इतिहासात सर्वाधिक सामने खेळणारे ५ संघ, चेन्नई आहे ‘या’ स्थानावर
चेन्नई-पंजाबला अस्मान दाखवणाऱ्या दिल्लीला हैदराबादने लोळवलं, ‘हे’ ५ खेळाडू ठरले विजयाचे शिल्पकार
चिन्नप्पापट्टी ते युएई असा प्रवास करणारा ‘टी नटराजन’
महत्त्वाच्या बातम्या-
‘राहुल द्रविडच्या शिष्यांची बातच न्यारी!’,विराट-धोनीसारख्या दिग्गजांच्या गर्दीतही होतेय चर्चा
संजू मार रहा है! हे सगळं घडलं ते केवळ कोहलीमुळे, वाचा काय आहे कारण…
आरसीबीसाठी ‘धोनी’ बनला आहे एबी डिविलियर्स, जाणून घ्या काय आहे कारण