भारत विरुद्ध इंग्लंड संघात पुढील महिन्यात ४ सामन्यांची कसोटी मालिका रंगणार आहे. ५ फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या या मालिकेतील पहिले २ सामने चेन्नईमधील एमए चिदंबरम स्टेडियमवर होणार आहेत. तर शेवटचे २ सामने अहमदाबादमध्ये होणार आहेत. या मालिकेसाठी दोन्ही संघ चेन्नईला पोहचले असून २ फेब्रुवारीपासून सरावाला सुरुवात करतील. त्यामुळे जसजशी ही मालिका जवळ येत आहे, चाहत्यांमध्येही उत्साह बघायला मिळत आहे. या मालिकेआधी आम्ही एक खास गोष्ट चेन्नईच्या स्टेडियममधील गणपतीच्या मंदिराबद्दल सांगणार आहोत.
चेपॉक स्टेडियममध्ये आहे गणपतीचे मंदिर
चेपॉक या नावानेही ओळखल्या जाणाऱ्या एमए चिदंबरम स्टेडियममध्ये एक छोटे गणपतीचे मंदिर आहे. चेपॉक स्टेडियममधील व्ही पट्टभिरमण नावाच्या गेटमधून आत गेल्यानंतर तिथे छोटे मंदिर आहे. त्यात एक गणपतीचा फोटो असलेली फ्रेम आहे. या मंदिराबद्दल असे सांगितले जाते की तमिळनाडू क्रिकेट असोसिएशनचे काही अधिकारी धार्मिक प्रवृत्तीचे आहेत आणि गेटमधून आत आल्यानंतर या मंदिरातील गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर शांत वाटते.
असे असले तरी, हे मंदिर कधीपासून स्टेडियममध्ये आहे किंवा कोणी आणि कोणत्या कारणाने ते स्थापन केले आहे, याबद्दल कोणतीही स्पष्टता नाही.
हैदराबादच्या स्टेडियममध्येही आहे गणपतीचे मंदिर –
चेपॉक हे भारतातील गणपतीचे मंदिर असलेले एकमेव स्टेडियम नाही, तर हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्येही गणपतीच्या मंदिराची स्थापना करण्यात आली आहे.
“सामान्यपणे हे मंदिर आपल्याला दिसत नाही. त्या मंदिराच्या पाठीमागे अनेक कल्पना आहेत. हे मंदिर २०११ सालामध्ये बांधण्यात आले होते. हे मंदिर बांधण्यामागचे कारण म्हणजे या ठिकाणी भारतीय संघ आणि आयपीएलमधील हैद्राबादचा डेक्कन चार्जेस हे दोन्ही संघ सामने जिंकत नव्हते. घरच्या संघासाठी हे मैदान अशुभ ठरत होते. या मैदानाच्या वास्तुमध्ये चूक असल्याचे सांगितले जात होते. गणपतीला वास्तुशास्त्राची देवता मानतात. त्यामुळे तेथे गणपतीचे मंदिर बांधण्यात आले आहे.” असे मंदिराचे पुजारी हनुमंत शर्मा यांनी सांगितले.
साल २०११ पासून भारतीय संघ या मैदानावर ९ आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे. त्यात भारताने ८ सामने जिंकले आहेत. तर एक सामना रद्द झाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
फ्लॅशबॅक! १५ वर्षांपूर्वी इरफान पठाणने पाकिस्तान विरुद्ध घेतली होती हॅट्रिक, पहा व्हिडिओ
‘कसोटी पदार्पणाच्या पहिल्या रात्री खूप नर्वस झालो होतो, झोपीच्या गोळ्या…’, शुबमन गिलचा मोठा खुलासा
चेतेश्वर पुजराला अजूनही वनडे आणि टी२० क्रिकेट खेळण्याची आस, म्हणाला….