ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या बॉर्डर- गावसकर ट्रॉफी सीरिजमध्ये २-१ ने ऑस्ट्रेलिया संघाला त्यांच्यात धरतीवर धूळ चारण्यास मोलाचे योगदान देणाऱ्या युवा यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंत याच्या आक्रमक खेळाचे सर्वच दिवाणे झाले आहे. या युवा खेळाडूचे सर्वत्रच कौतुक केले जात आहे. अशातच इंग्लंड संघाचे माजी कर्णधार माइकल वॉन याने पंतची तुलना धुव्वाधार फलंदाजी करणाऱ्या विरेंद्र सेहवागसोबत केली आहे.
रिषभ पंतची तुलना विरेंद्र सेहवाग सोबत
माइकल वॉन याने पंतचे कौतुक करताना म्हटले, “जेव्हा पंत फलंदाजी करण्यासाठी येतो तेव्हा गोलंदाजाच्या डोळ्यात भय दिसून येते. जसे सेहवाग फलंदाजी करायला यायचा तेव्हा दिसून यायचे. सेहवाग असा फलंदाज होता जो समोरच्या गोलंदाजामध्ये भीतीचे वातावरण निर्माण करायचा. पंत जेव्हा ६ व्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी येतो, तेव्हा त्याच्यातही तीच क्षमता दिसून येते. तो कधी- कधी चुकीचा शॉट खेळून लवकर बाद होतो. परंतु तो नेहमीच सामना जिंकवणाच्या प्रयत्न करत असतो.”
पंत स्टोक्ससारखा मजेशीर फलंदाज
वॉन यांनी सेहवागनंतर पंतची तुलना इंग्लंड संघाचा खेळाडू बेन स्टोक्स याच्यासोबत केली. ते म्हणाले, “पंत हा स्टोक्ससारखा मजेशीर खेळाडू आहे. त्याला खेळताना पाहायला मजा येते. जेव्हा- जेव्हा पंत फलंदाजी करण्यासाठी येतो. तेव्हा मी सामना नक्की पाहतो. तो ज्या जोशमध्ये खेळतो. त्याने असे दिसून येते की तो भारतीय संघात खूप काळ टिकून राहील.”
रिषभ पंतची आंरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द
रिषभ पंत याने २०१८ साली कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने आतापर्यंत १६ कसोटी सामन्यात ४३.५ च्या सरासरीने १०८८ धावा केल्या आहेत. यात २ शतक तर ४ अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच १६ वनडे सामन्यात २६.७ च्या सरासरीने ३७४ धावा केल्या आहेत. याबरोबरच २८ टी -२० सामन्यात २०.५ च्या सरासरीने एकूण ४१० धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
T10 League: ‘युनिव्हर्सल बॉस’ची वादळी खेळी, दुसऱ्यांदा १२ चेंडूत झळकावले अर्धशतक
IND Vs ENG : चेन्नई कसोटीत ‘अशी’ असू शकते टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन
श्रीलंकाविरुद्ध द्विशतक झळकावणाऱ्या जो रूटला खेळायचा आहे टी२० विश्वचषक, म्हणाला…