वनडे विश्वचषक 2023 मध्ये शुक्रवारी (20 ऑक्टोबर) ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात आमना सामना झाला. ऑस्ट्रेलियाने या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्श यांनी ऑस्ट्रेलिया या सामन्यात अप्रतिम सुरुवात मिळवून दिली. मिचेल मार्श याने 100 चेंडूत 100 धावांची खेळी केली.
मिचेल मार्श (Mitchell Marsh) याच्या शतकात 10 चौकार आणि 6 षटकारांचा समावेश होता. डावातील 31व्या षटकात त्याने कारकिर्दीतील दुसरे वनडे शतक पूर्ण केले. दरम्यान, मार्शसाठी हे शतक अजून एका कारणास्तव खास ठरले. ऑस्ट्रेलियाचा हा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज शुक्रवारी आपला 32 वा वाढदिवस साजरा करत आहे. अशात पाकिस्तानविरुद्ध केलेले हे शतक त्याने स्वतःला दिलेली एकप्रकारे भेट ठरली आहे.
दरम्यान, मार्शच्या शतकाच्या फक्त एक चेंडू आधी सलामीवीर डेव्हिड वॉर्नर (David Warner) यानेही शतक पूर्ण केले. वॉर्नरने 85 चेंडूत शतक पूर्ण केल्या. वनडे विश्वचषक 2023 मधील सर्वात मोठी भागीदारी आता वॉर्नर आणि मार्श यांच्या नावावर झाली आहे.
विश्वचषकातील 18व्या सामन्यासाठी उभय संघांची प्लेइंग इलेव्हन
ऑस्ट्रेलिया – डेविड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लॅब्युशेन, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉयनिस, पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, ऍडम झाम्पा, जोश हेझलवूड
पाकिस्तान – अब्दुल्ला शफीक, इमाम-उल-हक, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), सौद शकील, इफ्तिखार अहमद, मोहम्मद नवाज, उसामा मीर, हसन अली, शाहीन आफ्रिदी, हॅरिस रौफ
महत्वाच्या बातम्या –
थांबा! वाइड बॉलसाठी अंपायरवर साधताय निशाणा? आधी ICCचा ‘हा’ नियम काय सांगतो वाचाच
Breaking: 4 आयपीएल ट्रॉफी विजेता मलिंगा पुन्हा मुंबई पलटणच्या ताफ्यात, सांभाळणार ‘ही’ जबाबदारी