महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजेच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी (20 ऑगस्ट) मुंबई येथील छत्रपती शिवाजी पार्क येथे टेनिस खेळण्याचा आनंद लुटला. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एक वर्षापूर्वी त्यांना असेच टेनिस खेळताना पाहिले गेले होते.
राज ठाकरे यांची 'टोलेबाजी', टेनिस खेळण्याचा लुटला आनंद #RajThackeray pic.twitter.com/s7VgDErpJE
— Marathi Fire (सत्य, जसे आहे तसे) (@marathifire) August 20, 2023
छत्रपती शिवाजी पार्क येथे रविवारी स्वातंत्र्य दौड आयोजित केली गेली होती. तिथे सहभाग नोंदवल्यानंतर ठाकरे यांनी काही काळ टेनिस खेळले. यादरम्यान ते चांगले तंदुरुस्त दिसून येत होते. दोन वर्षांपूर्वी त्यांनी आपले पुत्र अमित ठाकरे यांच्यासोबत टेनिस खेळण्याचा आनंद लुटलेला. त्यानंतर शस्त्रक्रियेमुळे त्यांना अशा प्रकारे मैदानावर खेळता येत नव्हते. राज ठाकरे हे मोठे टेनिसप्रेमी असून, त्यासाठी वारंवार उल्लेख करत असतात.
राज ठाकरे यांचे पुत्र व विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे हे देखील टेनिस व फुटबॉल यांचे मोठे चाहते असल्याचे सांगितले जाते. त्याचबरोबर क्रीडा क्षेत्रातील अनेक नामांकित खेळाडूंशी त्यांची चांगली मैत्री आहे.
(MNS Chief Raj Thackeray Playing Tennis At Shivaji Park)
महत्त्वाच्या बातम्या-
आणखी किती खेळणार उस्मान ख्वाजा? पठ्ठ्याने स्पष्टच सांगितलं; म्हणाला, ‘जोपर्यंत…’
‘पहिल्यांदाच भारतीय खेळाडूशिवाय ड्रेसिंग रूम…’, CPL 2023मध्ये रायुडूला झाली टीम इंडियाची आठवण