शुक्रवारी इंडियन प्रीमियर लीग २०२०चा ७वा सामना झाला. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियम, दुबई येथे चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात हा सामना खेळला गेला. चेन्नई संघाचा हा या हंगामातील तिसरा सामना तर दिल्ली संघाचा दूसरा सामना होता.
या सामन्यात चेन्नईने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे दिल्ली संघाची ठरलेली शिखर धवन आणि पृथ्वी शॉ यांची सलामी जोडी फलंदाजीसाठी मैदानावर उतरली. २० वर्षीय शॉने दमदार फटकेबाजी केवळ ३५ चेंडूत ६४ धावांची खेळी केली. यासह तो आयपीएल इतिहासात वयाच्या २१व्या वर्षी सर्वाधिकवेळा ५० पेक्षा जास्त धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत दूसऱ्या स्थानावर आला आहे. Most 50+ Scores In IPL Before Age Of 21
शॉने आतापर्यंत आयपीएलमध्ये तब्बल ५ वेळा ५०पेक्षा जास्त धावा करण्याचा कारनामा केला आहे. त्याच्याआधी या यादीत दिल्ली संघाचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत अव्वल स्थानावर विराजमान आहे. पंतने वयाची २१ वर्षे पूर्ण करण्यापुर्वी आयपीएलमध्ये ९ वेळा अर्धशतकी खेळी केली आहे. तर संजू सॅमसन, शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर हे यादीत संयुक्तपणे तिसऱ्या स्थानावर विराजमान आहेत. त्यांनी ४वेळा ५० पेक्षा जास्त धावांची खेळी करत हा कारनामा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
२०१८ पासून दिल्ली संघाचा भाग असणाऱ्या शॉने आतापर्यंत आयपीएलमध्ये एकूण २७ सामने खेळले आहेत. त्यात त्याने २४.६०च्या सरासरीने ६६७ धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
सीएसके संघाने जिंकली नाणेफेक, ‘या’ खेळाडूंना मिळाली प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी
आरसीबीविरुद्ध शतकी खेळी केल्याबद्दल केएल राहुलचे रोहित शर्माने केले कौतुक, म्हणाला…
जावेद मियाँदादच्या पुतण्यावर ओढवले संकट, ‘या’ कारणामुळे बोर्डाने काढून घेतले पद
ट्रेंडिंग लेख –
पंजाबच्या ‘या’ ५ शिलेदारांनी गाजवला सामना, बेंगलोरला केले चीतपट
शतक एक विक्रम अनेक! जाणून घ्या केएल राहुलने केलेले ८ महत्त्वाचे विक्रम
आयपीएल २०२० च्या हंगामात सर्वाधिक किंमत मिळालेले फिरकीपटू, एक नाव आहे धक्कादायक