रविवारी (दि. 3 नोव्हेंबर) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात 5 सामन्यांच्या टी20 मालिकेतील अखेरचा सामना खेळला जात आहे. बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडिअम येथे रंगलेल्या या सामन्यात भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज ऋतुराज गायकवाड याने इतिहास घडवला आहे. ऋतुराज हा कोणत्याही टी20 मालिकेत भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज बनला. यावेळी त्याला विराट कोहली याचा रेकॉर्ड मोडण्याची संधी होती, पण त्याला 9 धावा कमी पडल्या.
ऋतुराजचा विक्रम
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) संघातील पाचव्या टी20 सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. तसेच, भारताला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. यावेळी भारताकडून डावाची सुरुवात करताना ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) स्वस्तात बाद झाला. त्याने 12 चेंडूत 10 धावांची खेळी केली. त्याच्या खेळीत 2 चौकारांचाही समावेश होता. ऋतुराजने यावेळी छोटेखानी खेळीत मोठा पराक्रम केला. तो त्याने 10 धावा करताच संपूर्ण मालिकेत भारतासाठी सर्वाधिक धावा करण्याचा मान मिळवला.
विराट अव्वलस्थानी
ऋतुराज गायकवाड याने 5 सामन्यात फलंदाजी करताना 55.75च्या सरासरीने आणि 159.29च्या सरासरीने सर्वाधिक 223 धावा केल्या आहेत. यामध्ये 1 शतक आणि 1 अर्धशतकाचाही समावेश आहे. तो असा पराक्रम करणारा भारताचा तिसरा खेळाडू ठरला आहे. त्याच्यापूर्वी भारतासाठी एका टी20 मालिकेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम भारतीय दिग्गज फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) याच्या नावावर आहे. विराटने इंग्लंडविरुद्धच्या टी20 मालिकेत 231 धावा केल्या होत्या. अशाप्रकारे ऋतुराजला विराटचा विक्रम मोडण्यासाठी फक्त 9 धावा कमी पडल्या. तसेच, दुसऱ्या स्थानी केएल राहुल (KL Rahul) आहे. त्याने न्यूजीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेत 224 धावा केल्या होत्या.
Most runs in a T20i bilateral series for India:
Virat Kohli – 231.
KL Rahul – 224.
Ruturaj Gaikwad – 223. pic.twitter.com/DmVe1cWV6j— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) December 3, 2023
टी20 मालिकेत भारतीय संघासाठी सर्वाधिक धावा करणारे खेळाडू
231 धावा- विराट कोहली, विरुद्ध- इंग्लंड
224 धावा- केएल राहुल, विरुद्ध- न्यूजीलंड
223 धावा- ऋतुराज गायकवाड, विरुद्ध- ऑस्ट्रेलिया*
पाचव्या टी20 सामन्यासाठी भारतीय संघांची प्लेइंग इलेव्हन
यशस्वी जयसवाल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, रवी बिश्नोई, आवेश खान, मुकेश कुमार, अर्शदीप सिंग (Most runs for India in a T20I Series Ruturaj Gaikwad 3rd In the list)
हेही वाचा-
Video: घोड्यावर प्रेमाचा वर्षाव करत होता धोनी, पण पुढे घडलं ‘असं’ काही, माहीला म्हणावं लागलं, ‘अरे…’
ऑस्ट्रेलियाची प्रतिष्ठा पणाला! पाचव्या सामन्यात टॉस जिंकून घेतला ‘हा’ निर्णय, भारतीय संघात एक मोठा बदल