क्रीडाविश्वातून धक्कादायक बातमी समोर येत आहे. सोमवारी (दि. 02 जानेवारी) अमेरिकेचा प्रो-रॅली ड्रायव्हर आणि युट्यूब स्टार केन ब्लॉक याचे निधन झाले. तो 55 वर्षांचा होता. त्याच्या निधनाने क्रीडाविश्वावर शोककळा पसरली आहे. ऑटोमोबाईल कंटेंट कंपनी हुनिगनचा सह संस्थापक असणाऱ्या केनने स्नोमोबाईल दुर्घटनेत जगाचा निरोप घेतला. हुनिगन आणि स्थानिक अधिकाऱ्यांनी या दुर्घटनेनंतर केनच्या निधनाची पुष्टी केली.
केन ब्लॉक (Kane Block) हा एका स्पोर्ट्सवेअर कंपनीचा सहसंस्थापकही होता. केन ब्लॉक याचे निधन (Ken Block Death) झाल्याने मित्र आणि चाहत्यांमध्ये दु:खाचे वातावरण आहे. तो स्थानिक वेळेनुसार दुपारी 2 वाजता वुडलँडच्या बाहेर ज्या स्नोमोबाईलची सवारी करत होता, तेव्हाच स्नोमोबाईल पलटली आणि त्याच्यावर येऊन पडली. त्यामुळे त्याचे निधन झाले. दुर्घटनेच्या काही तासांआधीच त्याने त्याच्या 16 वर्षीय मुलीसाठी मन जिंकणारी पोस्ट ट्विटरवर शेअर केली होती.
The 4th and final episode of my 16-year-old daughter Lia buying, tearing down, rebuilding and now driving her ‘85 Audi Ur Quattro will be live at 8am PST tomorrow on my YouTube channel. Will her Audi finally do a donut?? Or will itbreak in the attempt? Tune in to find out! pic.twitter.com/p5SLV0vPUE
— Ken Block (@kblock43) January 2, 2023
हुनिगन रेसिंग डिव्हिजनने म्हटले की, “आम्हाला याची पुष्टी करताना खूपच खेद होत आहे की, आज स्नोमोबाईल दुर्घटनेत केन ब्लॉक यांचे निधन झाले आहे.”
https://www.instagram.com/p/Cm74ZDVL_PS/?hl=en
We are deeply saddened to hear of Ken Block's passing. He will be sorely missed. pic.twitter.com/X2bvSP485f
— The Crew Motorfest (@TheCrewGame) January 3, 2023
काय झालं नेमकं?
माध्यमांतील वृत्तांनुसार, 55 वर्षीय केन सोमवारी दुपारी एक स्नोमोबाईल चालवत होता, तेव्हाच ती अचानक पलटली आणि त्याच्या अंगावर पडली. वाशेच काऊंटी पोलिसांच्या हवाल्याने सांगण्यात आले की, घटनास्थळीच त्याला मृत घोषित करण्यात आले. पोलिसांच्या माहितीनुसार, दुर्घटनेवेळी केन एकटाच होता.
केन ब्लॉक हा ऍक्शन स्पोर्ट्स स्टार होता. तो 1994मध्ये निर्माण केलेल्या स्केटबोर्ड ब्रँड डीसी शूज कंपनीचा सहमालक होता. तसेच, 10 वर्षांनंतर जेव्हा कंपनी विकण्यात आली, तेव्हा त्याने रॅली ड्रायव्हिंग कारकीर्दीची सुरुवात केली होती. तो युट्यूबवर त्याचे 10 भागांच्या सीरिजसाठीही प्रसिद्ध होता. यानंतर त्याला चांगलीच ओळख मिळाली होती. यामध्ये तो धोकादायक ट्रॅक आणि अडथळ्यांच्या कोर्सवर स्टंट करताना दिसला होता. (motorsport legend ken block died at the age of 55 know more)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आईसलँडवाल्यांची एवढी हिम्मत! ‘किंग’ कोहलीचा खुलेआम अपमान
सूर्या श्रीलंकन फलंदाजांची करणार धुलाई! नेट्समध्ये खेळले एकापेक्षा एक शॉट्स