Loading...

मुंबई महापौर चषक राष्ट्रीय फिल्ड इनडोअर तिरंदाजी स्पर्धेचे राष्ट्रीय जेतेपद महाराष्ट्राला तर राज्य-जिल्ह्यात पोयसर जिमखाना अव्वल

मुंबई। “मुंबई महानगर पालिका” व “मुंबई तिरंदाजी संघटना” यांच्या संयुक्त विद्यमाने तथा फिल्ड आर्चेरी असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या सहकार्याने “मुंबई महापौर चषक राष्ट्रीय फिल्ड इनडोअर तिरंदाजी” स्पर्धेत महाराष्ट्राच्याच तिरंदाजाचा बोलबाला दिसला. महाराष्ट्राने ३७ सुवर्णांसह ९६ पदके जिंकून सांघिक विजेतेपदे काबीज केली तर मुंबई पातळीवरील स्पर्धेत कांदिवलीच्या पोयसर जिमखान्याने सर्वाधिक १७ सुवर्ण जिंकून बाजी मारली.त्याचप्रमाणे राज्यातही पोयसरनेच धमाका केला.

नुकत्याच शहाजी राजे भोसले क्रीडा संकुलात पार पडलेल्या स्पर्धेत यजमान महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश, गुजरात, हरयाणा, कर्नाटक, पंजाब, राजस्थान, तामिळनाडू, तेलंगाना, उत्तराखंड, उत्तरप्रदेश या राज्यातील सुमारे ६०० स्पर्धक सहभागी झाले होते.

मुंबई महापौर चषक राष्ट्रीय फिल्ड इनडोअर तिरंदाजी स्पर्धा १०, १४, १७, १९ वर्षांखालील मुले आणि मुले व सिनिअर आणि वेटरन (३५ वर्षांवरील ) पुरुष आणि महिला अशा ६ वयोगटात तर १४ प्रकारच्या धनुष्य प्रकारात घेण्यात आली. सदर स्पर्धेस अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडू देखील सहभागी होते.
या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभप्रमुख सुभाष देसाई (उद्योगमंत्री, महाराष्ट्र ) सुभाष नायर, संजय पीठावा, उदय कुमार वर्दी उपस्थित होते.

स्पर्धेचे राष्ट्रीय स्तरावरील विजेतेपद हे यजमान महाराष्ट्र राज्याने ३७ सुवर्ण, २८ रौप्य, ३१ कांस्य पटकावले, हरयाणा राज्याला ५ सुवर्ण, ७ रौप्य, ५ कांस्य पटकावत उपविजेते पदावर समाधान मानावे लागले तर आंध्रप्रदेशने ७ सुवर्ण, ३ रौप्य, १ कांस्य पटकावत तिसरा क्रमांक पटकाविला.

स्पर्धेचे मुंबई स्तरावरील विजेतेपद हे कांदिवलीच्या पोयसर जिमखान्याने १७ सुवर्ण, ८ रौप्य, १ कांस्य पटकावले. अस्मिता आर्चेरी केंद्र ४ सुवर्ण, ४ रौप्य, ६ कांस्यपदकासह दुसऱ्या स्थानावर राहिला तर डीएव्ही आर्चेरी केंद्र यांनी ४ सुवर्ण, १ रौप्य, ६ कांस्य पटकावत तिसरा क्रमांक पटकाविला.

पोयसर जिमखान्याने मुंबई महापौर चषक राष्ट्रीय फिल्ड इनडोअर आर्चेरी स्पर्धेच्या राष्ट्रीय स्तरावर १३ सुवर्ण, १३ रौप्य, २ कांस्य पटकावले तर मुंबई विभागीय स्तरावर १७ सुवर्ण, ८ रौप्य, १ कांस्य पटकावले. असे एकूण स्पर्धेत ३० सुवर्ण, २१ रौप्य, ३ कांस्य पटकावले व महाराष्ट्राला सांघिक विजेतेपद मिळवून देंण्यात हातभार लावला. तसेच मुंबई विभागात सलग दुसऱ्या वर्षी सांघिक विजेतेपद पटकावण्याचा पराक्रम केला.

मुंबईतील पदक विजेते तिरंदाज –

Loading...

९ पदके : रेयांश ठाकूर (५ सुवर्ण, ४ रौप्य)
४ पदके : काम्या वर्गीस (४ सुवर्ण)
४ पदके :अनाया ठक्कर (४ सुवर्ण)
५ पदके : कौस्तुभ सुळे (३ सुवर्ण, १ रौप्य, १ कांस्य)
५ पदके : व्योम शाह (३ सुवर्ण, १ रौप्य, १ कांस्य)
४ पदके : कुणाल सखरानी (३ सुवर्ण, १ रौप्य)
७ पदके : मिताशी निमजे (२ सुवर्ण, ५ रौप्य)
३ पदके : आर्यक मल्होत्रा (२ सुवर्ण, १ रौप्य)
४ पदके : सेजल गावडे (१ सुवर्ण, ३ रौप्य)
२ पदके : गीत कनोजिया (१ सुवर्ण, १ रौप्य)
२ पदके : केसर ठाकर (१ सुवर्ण, १ कांस्य)
२ पदके : श्रुती केळकर (२ रौप्य)
२ पदके : वेदांती राठोड (२ रौप्य)

You might also like
Loading...