बांगलादेशने पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत ऑस्ट्रेलियाचा पराभव करून इतिहास रचला आहे. ऑस्ट्रेलियन संघाच्या या दारुण पराभवाचा क्रिकेटजगात क्वचितच कोणी विचार केला असेल. तिसऱ्या टी-२० मध्ये बांगलादेशने ऑस्ट्रेलियाचा १० धावांनी पराभव करत मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी घेतली. बांगलादेशने प्रथमच ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-२० मालिका जिंकली. बांगलादेशने कोणत्याही स्वरुपामध्ये सलग तीन सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचा पराभव करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
बांगलादेशविरुद्ध, ऑस्ट्रेलियन संघ यावेळी सर्वत्र कमकुवत दिसत होता. ऑस्ट्रेलियन अष्टपैलू ॲश्टन एगरने देखील लाजिरवाणी कामगिरी केली. त्याने तीन सामन्यांमध्ये केवळ ७ धावा केल्या आणि एक विकेट मिळवली आहे.
३० वर्षांत प्रथमच झाले असे
एगरने सामन्यानंतर सांगितले की, त्याची पत्नी आनंदी नाही. वास्तविक याचे कारण ऑस्ट्रेलियामध्ये या मालिकेचे प्रसारण न करणे आहे. मिशेल स्टार्क, जोश हेझलवूड, मिशेल मार्श, मॅथ्यू वेडसारखे खेळाडू या मालिकेत खेळत आहेत. असे असून देखील या मालिकेचे प्रसारण ऑस्ट्रेलियामध्ये केले जात नाही. ३० वर्षांत असे होण्याची ही पहिलीच वेळ आहे. एगरने बीडी क्रिकटाइमशी या विषयावर बोलताना सांगितले की, “माझी पत्नी ऑस्ट्रेलियामध्ये मायदेशी परतल्यावर ऑस्ट्रेलिया-बांगलादेश टी-२० सामने पाहू शकत नाही. तिला मला खेळताना बघता येत नसल्याने ती नाखुष आहे.”
फायद्यापेक्षा नुकसानीची आधिक चिंता
ऑस्ट्रेलियात मालिका प्रसारित न करण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे ऑस्ट्रेलियन प्रसारमाध्यमांना असे वाटले की, जर त्यांनी मालिका प्रसारित केली. तर ती त्यांच्या भल्यापेक्षा जास्त नुकसान करेल. याशिवाय, प्रायोजकांची कमतरता ही देखील एक समस्या होती. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने सर्वतोपरी प्रयत्न केले असले तरी, त्यांना यूट्यूब चॅनेलवर मालिका प्रसारित करण्यात यश आले नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
लाईव्ह सामन्यात १००% मनोरंजन! रिषभ मैदानातच मारू लागला बेडूक उड्या, रोहित-विराट अचंबित
ऑस्ट्रेलियाच्या ‘या’ फलंदाजाने शाकिबला दिवसा दाखवले चांदणे, लाजिरवाण्या विक्रमाची झाली नोंद