ऐम टेनिस अकादमी यांच्या तर्फे आयोजित व पॅरेंट्स ग्रुप यांच्या सहकार्याने व एआयटीए, एमएसएलटीए, पीएमडीटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या एमएसएलटीए – नवसह्याद्री क्रीडा संकूल अखिल भारतीय मानांकन चॅम्पियनशिप सिरीज (14 वर्षाखालील) टेनिस स्पर्धेत उपांत्य फेरीत नील केळकर, शार्दूल खवले, श्रेया पठारे व ह्रतिका कापले यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला.
नवसह्याद्री क्रीडा संकूल टेनिस कोर्ट येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत उपांत्य फेरीत मुलांच्या गटात संघर्षपूर्ण लढतीत चौथ्या मानांकीत नील केळकरने सहाव्या मानांकीत अहान शेट्टीचा 6-3(7-6), 7-3 असा तर दुस-या मानांकीत शार्दूल खवलेने तिस-या मानांकीत वरद पोळचा 6-4(7-2), 6-3(6-6) असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. मुलींच्या गटात अव्वल मानांकीत श्रेया पठारेने ध्रुवी आद्यंथया हीचा6-3, 2-6, 6-2 असा तर सहाव्या मानांकीत ह्रतिका कापलेने चौथ्या मानांकीत ईरा देशपांडेचा 6-1, 6-3 असा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली.
दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत मुलांच्या गटात नील केळकर व शौनक सुवर्ण या अव्वल मानांकीत जोडीने अनिकेत चौब्री व अथर्व येलभर यांचा 6-2, 6-2 असा तर हंसल शहा व अर्जुन परदेशी यांनी स्वर्णिम येवलेकर व नमिश हुड यांचा 6-2, 7-6(4) असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. अहान शेट्टी व अयान शेट्टी या दुस-या मानांकीत जोडीने श्लोक चौहान व सक्षम भन्साळी यांचा 6-2, 7-6(7) असा पराभव केला. मुलींच्या गटात ध्रुवी आद्यंथया व स्वनिका रॉय या बिगर मानांकीत जोडीने हृतिका कपले व नेहा केळकर या तिस-या मानांकीत जोडीचा 6-4, 6-3 असा तर आर्या शिंदे व श्रेया पठारे या अव्वल मानांकीत जोडीने आरोही देशमुख व सहना कमलकन्नन यांचा 6-2, 6-0 असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: मुख्य ड्रॉ: उपांत्य फेरी: मुले
नील केळकर(मह)(4)वि.वि. अहान शेट्टी (महा)(6) 6-3(7-6), 7-3
शार्दूल खवले (महा)(2) वि.वि. वरद पोळ(महा)(3) 6-4(7-2), 6-3(6-6)
उपांत्य फेरी: मुली:
श्रेया पठारे(महा)(1) वि.वि.ध्रुवी आद्यंथया(महा) 6-3, 2-6, 6-2
ह्रतिका कापले(महा)(6) वि.वि इरा देशपांडे(महा)(4) 6-1, 6-3
दुहेरी: उपांत्यपूर्व फेरी मुले:
नील केळकर/शौनक सुवर्ण(1) वि.वि अनिकेत चौब्री/अथर्व येलभर 6-2, 6-2
हंसल शहा/अर्जुन परदेशी वि.वि स्वर्णिम येवलेकर/नमिश हुड 6-2, 7-6(4)
ऋषिकेश माने/ओमेश औटी वि.वि वरद पोळ/आराध्य म्हसदे(3) 6-3, 6-3
अहान शेट्टी/अयान शेट्टी(2) वि.वि श्लोक चौहान/सक्षम भन्साळी 6-2, 7-6(7)
मुली:
आर्या शिंदे/श्रेया पठारे(1) वि.वि आरोही देशमुख/सहना कमलकन्नन 6-2, 6-0
सृष्टी सूर्यवंशी/अविपशा देहुरी(4) वि.वि मायरा टोपनो/आर्या पाठक 6-1, 6-1
ध्रुवी आद्यंथया/स्वनिका रॉय वि.वि हृतिका कपले/नेहा केळकर(3) 6-4, 6-3
मेहा पाटील/इरा देशपांडे(2) वि.वि काव्या देशमुख/ऋषिता पाटील 6-3, 6-2
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
चॅम्पियन ऑस्ट्रेलियाविरुद्ध राशिद खानचा कहर, टी20 विश्वचषकातील ‘हा’ बलाढ्य रेकॉर्ड केला नावावर
शार्दुलने धोनीबद्दल केला मोठा खुलासा; जे काही म्हणाला, त्याने ‘माही’वरील तुमचंही प्रेम आणखी वाढेल