यावर्षी भारताता आयसीसी वनडे विश्वचषकाचे आयोजिन केले जाणार आहे. विश्वचषकासाठी पाकिस्तान संघ भारतात येण्याची अपेक्षा आहे. पाकिस्तान विश्वचषकातील आपेल सामने चेन्नई आणि कोलकाता याठिकाणी खेणार आहे, असी माहिती सध्या समोर येत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीच्या एका सूत्राकडून ही माहिती मिळाली आहे.
यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात आयोजित वनडे विश्वचषका (ICC ODI World Cup 2023) भारतातील एकूण 12 वेगवेगळ्या शहरांमध्ये खेळवला जाणार आहे. विश्वचषकात एकूण 46 सामने खेळले जाणार आहेत. अहमदाबाद, लखनऊ, मुंबई, राजकोट, बेंगलोर, दिल्ली, इंदोर, गुवाहाटी आणि हैदराबाद या शहरांचा समावेश या 12 शहरांमध्ये जवळपास पक्का मानला जात आहे. 5 ऑक्टोबर रोजी विश्वचषकाची सुरुवात होऊ शकते. माहितीनुसार पीसीबी वनडे विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर सध्या आयसीसीसोबत चर्चा करत आहे.
याविषयी माहिती असणाऱ्या एका वरिष्ठ आयसीसी अधिकाऱ्याने अशी माहिती दिली केली, “बीसीसीआय आणि भारत सरकार याक निर्णय घेणार, यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. पण पाकिस्तानला विश्वचषकातील त्यांचे बहुतांश सामने कोलकाता आणि चेन्नईमध्ये खेळायला आवडेल.” असे असले तरी, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयोजित करणे आयसीसीसाठी फायद्याचे असेल. कारण या स्टेडियमची प्रेक्षकक्षणता 1,32,000 एवढी आहे. विश्वचषकाचा अंतिम सामना देखील याच ठिकाणी खेळला जाईल. आयसीसीची विश्वचषक समीत आणि बीसीसीआय येत्या काळात लवकरच विश्वचषकातील सामन्यांचे आयोजिन निश्चित करतील.
दरम्यान, पीसीबी आणि बीसीसीआय यांच्यातील आशिया चषका 2023चा वाद देखील अद्याप मिटला नाहीये. आगामी आशिया चषकाचे यजमानपत पाकिस्तानकडे आहे. माहितीनुसार बीसीसीआयच्या हट्टामुळे आशिया चषकात भारतीय संघाचे सर्व सामने पाकिस्तानच्या बाहेर आयोजित केले जाऊ शकतात. असे असेल तर, पाकिस्तान विश्वचषकासाठी आपले सामने भारतात केळणार की नाही? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. (Pakistan’s matches in the ODI World Cup could be held in these two cities)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मी चांगलाच खेळलो! वाचा 20 चेंडूत 18 धावा करणारा केएल राहुलचे काय म्हणाला
VIDEO: विजयानंतर आवेशने केले अशोभनीय वर्तन! मात्र, या कारणाने टळली कारवाई