पुणे : विनायक नवयुग मित्र मंडळ ट्रस्ट आणि हिंद शक्ती सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राजाराम विष्णू आगरकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ १५ व्या एकदिवसीय राज्यस्तरीय जलद बुद्धिबळ स्पर्धेत प्रथमेश शेरलाने सहा गुणांसह अव्वल क्रमांक पटकावला.
महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ संघटना आणि पुणे जिल्हा बुद्धिबळ सर्कल यांच्या मान्यतेने भांडारकर रोडवरील साने डेअरी चौक येथील मिलेनियम टॉवर्स येथे झालेल्या या स्पर्धेतील खुल्या गटात सातव्या फेरीअखेर प्रथमेश, केवल निर्गुण, विहान दौडा, अक्षज पाटील यांचे समान सहा गुण झाले होते. मात्र, टायब्रेकमध्ये सरस ठरल्याने प्रथमेशने अव्वल क्रमांक पटकावला. केवल दुसऱ्या, विहान तिसऱ्या, तर अक्षज चौथ्या क्रमांकावर राहिला.
अलौकिक सिन्हा विजेता
स्पर्धेतील १४ वर्षांखालील मुलांच्या गटात अलौकिक सिन्हाने सात फेऱ्यांअखेर ६.५ गुणांसह अव्वल क्रमांक पटकावला. परम जलान (६) दुसऱ्या, तर राम लथिक (५.५) तिसऱ्या क्रमांकावर राहिले. स्पर्धेतील दहा वर्षांखालील मुलांच्या गटात कविश लिमयेने सात फेऱ्यांअखेर ६.५ गुणांसह अव्वल क्रमांक पटकावला. या स्पर्धेतील विजेत्यांना एकूण ५० हजार रुपयाची पारितोषिके करंडक पदके व प्रशस्तीपत्रक देण्यात आली स्पर्धेत 190 खेळाडूंनी भाग घेतला होता.
स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी आंतरराष्ट्रीय टेनिसपटू वैष्णवी आडकर, राजश्री जायभाय, गिरीश गणात्रा, अनिता खताळ, अभय शास्त्री, गुणेश साने, निहार आडकर, महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे सचिव निरंजन गोडबोले, आर्बीटर राजेंद्र शिदोरे, क्रीडा समिती अध्यक्ष अभिजीत मोडक उपस्थित होते.
या स्पर्धेचा बक्षीस समारंभ महाराष्ट्र रणजी क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुरेंद्र भावे, ग्रँडमास्टर अभिजीत कुंटे, नॉर्थ ईस्ट युनायटेड फुटबॉल संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार ताम्हाणे, महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे सचिव निरंजन गोडबोले, श्रुती आगरकर यांच्या हस्ते पार पडला. यावेळी आर्बीटर राजेंद्र शिदोरे, दीप्ती शिदोरे, विनिता श्रोत्री, विनायक नवयुग मित्र मंडळ ट्रस्टचे कार्याध्यक्ष सुनील पांडे लोहगावकर, क्रीडा समिती अध्यक्ष अभिजीत मोडक, चैतन्य रेड्डी, दिनेश अंबुरे, योगेश जोगळेकर, योगेश माळी, भूषण मोरे, वरुण जकातदार हे उपस्थित होते. यावेळी अनिल कुलकर्णी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
खुल्या गटातील सातव्या आणि अखेरच्या फेरीचे काही निकाल : अक्षज पाटील (६) बरोबरी वि. केवल निर्गुण (६); प्रथमेश शेरला (६) वि. वि. अर्णव नानल (५); अर्णव कदम (५.५) बरोबरी वि. यश वातरकर (५.५); श्रीकांत मुचंदीकर (५) पराभूत वि. विहान दौडा (६); ओम लामकाणे (५.५) वि. वि. संदेश बजाज (४.५); आदित्य जोशी (५) बरोबरी वि. प्रणव बुरली (५); सौरभ म्हामणे (५) वि. वि. शर्विल चौरीडुले (४); मुक्तानंद पेंडसे (४) पराभूत वि. धनश्री खैरमोडे (५); अविरत चौहान (५)वि. वि. श्रावणी उंडले (४); श्लोक शरणार्थी (४.५) बरोबरी वि. युग सोनिग्रा (४.५).
१४ वर्षांखालील गट – सातवी फेरी – मार्मिक शाह (५) पराभूत वि. अलौकिक सिन्हा (६.५); परम जलान (६) वि. वि. चिराग रेड्डी (४.५); राम लथिक (५.५) वि. वि. अन्वय माळी (४.५); रावुथू नायडू (५.५) वि. वि. धवल लोंढे (४.५); ईशान जांडू (५.५) वि. वि. राकेश मथियाझागन (४); शर्वी बाकलीवाल (४) पराभूत वि. श्रेयस सरदेशमुख (५); युग बारडिया (५) वि. वि. सोहम देशपांडे (४).
१० वर्षांखालील गट – शौर्य घेलानी (५) पराभूत वि. कविश लिमये (६.५); राघव पावडे (६) वि. वि. गौरांक्ष खंडेलवाल (४.५); ईशान अर्जुन पी. वाय. (५.५) वि. वि. शर्विल पोरे (४); सनय गोखले (४) पराभूत वि. कविन मथियाझागन (५); अनिष जवळकर (४) पराभूत वि. अर्जुन कौलगुड (५); अयान इनामदार (४) पराभूत वि. शौनक पाठक (५); पारस शर्मा (४.५) वि. वि. वेदांत यादव (४); पार्थ शिंदे (४.५) वि. वि. शौर्य सोनावणे (३.५).
महत्वाच्या बातम्या –
सातव्या “इन्फोसिस कप 2023-24” आंतर आयटी क्रिकेट स्पर्धेत इन्फोसिस बीयु, यार्डी संघांची विजयी सलामी
हैद्राबाद येथे होणाऱ्या ४९व्या राष्ट्रीय कुमार/कुमारी गट कबड्डी स्पर्धेकरीता महाराष्ट्राचे संघ जाहीर.