इंडियन प्रीमीयर लीग २०२१ च्या हंगामाचा पहिला टप्पा संपला असून दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होत आहे. असे असतानाच पंजाब किंग्स संघाला मोठा धक्का बसला आहे. त्यांचा नियमित कर्णधार केएल राहुल याच्यावर या हंगामातून बाहेर होण्याची नामुष्की ओढावू शकते. राहुलला अपेंडिक्स त्रास (आन्त्रपुच्छाचा त्रास) होत आहे. त्यामुळे त्याच्यावर शस्त्रक्रिया करावी लागणार आहे.
याच कारणामुळे रविवारी (२ मे) पंजाब किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झालेल्या हंगामातील २९ व्या सामन्यात तो अनुपस्थित होता. त्याच्या गैरहजेरीत मयंक अगरवालने संघाच्या नेतृत्त्वाची जबाबदारी सांभाळली होती. राहुलची तब्येत बिघडल्याने आता पंजाबची संघ मालकीण आणि प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री प्रीति झिंटा हिने प्रतिक्रिया दिली आहे.
आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटद्वारे ट्विट करत तिने राहुलसाठी प्रार्थना केली आहे. राहुलचा पंजाबच्या जर्सीतील फोटोतील शेअर करत तिने लिहिले आहे की, ‘केएल राहुलने लवकर बरे व्हावे म्हणून त्याच्यासाठी प्रार्थना करते.’ यावर पंजाब किंग्ज संघाने हृद्याचा इमोजी पाठवत प्रतिक्रिया दिली आहे.
❤️
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) May 2, 2021
पंबाज-राजस्थान सामना होण्यापुर्वी पंजाब संघाने ट्विट करत राहुलच्या आजाराबद्दल माहिती दिली होती. त्यांनी लिहिले होते की ‘केएल राहुलला काल रात्री ओटीपोटात खूप वेदना होत होत्या. त्याच्यावर ओषधांचाही परिणाम होत नसल्याने त्याला पुढील तपासणीसाठी इमर्जन्सी रुममध्ये नेण्यात आले. त्यावेळी त्याला अपेंडिक्सचा त्रास होत असल्याचे निदान झाले आहे. ही समस्या शस्त्रक्रियेनंतर सोडवली जाऊ शकते. त्याचमुळे त्याला हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे.’
Praying for KL Rahul’s health and speedy recovery 🙏❤️#SaddaPunjab #PunjabKings #IPL2021 pic.twitter.com/q81OtUz297
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) May 2, 2021
आयपीएलमधून होऊ शकतो बाहेर
राहुलची शस्त्रक्रिया झाली तर त्याला आयपीएलच्या १४ व्या हंगामातून बाहेर जावे लागू शकते. कारण कदाचीत त्याला शस्त्रक्रियेसाठी बायोबबलमधून बाहेर जावे लागू शकते. तसेच परत यायचे झाले तर पुन्हा कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करुन त्याला संघात सामील व्हावे लागेल. मात्र, अजून तरी त्याच्या उपलब्धतेबद्दल पंजाब संघाने कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
पंजाबला दुहेरी धक्का
राहुलच्या अनुपस्थितीत पंजाब संघाने अगरवालच्या नेतृत्त्वाखालील राजस्थानविरुद्ध सामना खेळला. या सामन्यात अगरवालने कॅप्टन्सी इनिंग खेळताना नाबाद ९९ धावा केल्या. परंतु संघातील इतर खेळाडू विशेष कामगिरी न करु शकल्याने त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. प्रथम फलंदाजी करताना पंजाब संघाने २० षटकात ६ बाद १६६ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात दिल्ली संघाने १७.४ षटकातच ३ विकेट गमावत त्यांचे लक्ष्य पूर्ण केले आणि सामना खिशात घातला.
महत्त्वाच्या बातम्या-
पृथ्वी शॉच्या विचित्र थ्रोमुळे रिषभ पंत घाबरला, ‘असा’ केला शेवटच्या क्षणी बचाव; पाहा तो प्रसंग
“नक्कीच सनरायझर्समध्ये कसली तरी डाळ शिजतेय,” वॉर्नरला संघाबाहेर केल्याने दिग्गजाचे मोठे वक्तव्य
‘तुझे हाल बघवेना’, संघनायकाचा बनला वॉटरबॉय; डेविड वॉर्नरची अवस्था बघून चाहते हळहळले