पाकिस्तान दौऱ्यावर असलेल्या न्यूझीलंड क्रिकेट संघाने सुरक्षेच्या कारणास्तव अखेरच्या क्षणी हा दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. दौऱ्यावरील पहिला वनडे सामना सुरू होण्यास काही तासांचा अवधी शिल्लक असताना न्यूझीलंड संघाने दौऱ्यातून माघार घेतली. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाच्या या निर्णयामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) नवनियुक्त अध्यक्ष रमीज राजा हे चांगलेच संतप्त झाले आहेत. त्यांनी सोशल मीडियाद्वारे न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाला धडा शिकवण्याचा मानस बोलून दाखवला.
प्रकरण आयसीसीत घेऊन जाणार
न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने अचानकपणे दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतल्यामुळे पाकिस्तान क्रिकेट चाहते व पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे पदाधिकारी संतप्त झाले आहेत. पीसीबी अध्यक्ष रमीज राजा यांनी ट्विट करताना म्हटले,
‘आमचे चाहते आणि खेळाडूंसाठी हा अत्यंत निराशाजनक दिवस आहे. सुरक्षेच्या मुद्यावरून एकतर्फी निर्णय घेत दौऱ्यातून बाहेर पडण्याचा मार्ग अत्यंत दुर्देवी वाटतो. आमच्याशी कोणतीही चर्चा न करता हा निर्णय घेतला गेला. न्यूझीलंड कोणत्या जगात राहते? त्यांना आम्ही आयसीसीसमोर धडा शिकवू.’
पाकिस्तानी कर्णधारही निराश
ऐनवेळी दौरा रद्द केला गेल्याने पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम हा देखील निराश दिसला. त्याने ट्विट करत लिहिले,
‘अचानकपणे मालिका रद्द करणे निराशजनक आहे. या मालिकेमुळे लाखो पाकिस्तानी नागरिकांच्या चेहऱ्यावर हसू आले असते. आम्हाला आमच्या सुरक्षा यंत्रणेच्या क्षमतेवर आणि विश्वासार्हतेवर शंका नाही. ते आमचा अभिमान आहेत.’
दौरा रद्द केल्यानंतर अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनी देखील या निर्णयावर नापसंती दर्शवली आहे.
चाहत्यांच्या संतप्त प्रतिक्रिया
न्यूझीलंड संघाने दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर अनेक पाकिस्तानी क्रिकेट चाहत्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या. न्यूझीलंड सोबत असलेले सर्व क्रिकेट संबंध तोडून टाकण्याचे काही चाहत्यांनी सुचवले. काहींनी ही मालिका रद्द करण्यामागे बीसीसीआयचा दबाव असल्याचे देखील म्हटले. या मालिकेसाठी न्यूझीलंडचा पहिल्या पसंतीचा आला नव्हता.
महत्त्वाच्या बातम्या-
आरसीबीच्या फलंदाजांच्या पहिल्या टप्प्यातील ३ ‘ब्लॉकब्लास्टर खेळी’, पडीक्कलचे नाबाद शतकही आहे यादीत