2019 विश्वचषक स्पर्धेनंतर भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री आणि सपोर्ट स्टाफ यांचा बीसीसीआशी असलेला करार संपणार संपणार आहे. पण बीसीसीआयने त्यांच्या करारात 45 दिवसांची वाढ केली आहे.
शास्त्रीसंह भारतीय संघाच्या सपोर्टमधील फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर, गोलंदाजी प्रशिक्षक भारत अरुण आणि क्षेत्ररक्षक प्रशिक्षक आर श्रीधर यांच्या करारात 45 दिवसांची वाढ करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयसाठी नेमुन दिलेल्या समीतीने(सीओए) घेतला आहे.
याबद्दल बीसीसीआयने म्हटले आहे, ‘काही चर्चेनंतर सीओएने सपोर्ट स्टाफचा करार 45 दिवसांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. कारण विश्वचषकानंतर सपोर्टस्टाफच्या मुलाखती घ्यायच्या आहेत.’
‘मुख्य प्रशिक्षक निवडण्यासाठी क्रिकेट सल्लागार समितीची (सीएसी) सहभाग आवश्यक आहे. म्हणून बीसीसीआय व्यवस्थापनाने सीएसीच्या सदस्यांशी बोलावे आणि त्यांच्या सेवांसाठी त्यांची अपेक्षा काय आहे हे निश्चित करावे. सीएसीसाठी संदर्भाच्या अटींचा मसुदा तयार करावा आणि सीओएच्या विचारासाठी प्रसारित केला जावा.’
क्रिकेट सल्लागार समितीमध्ये सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्हीव्हीएल लक्ष्मण यांचा समावेश होता. परंतू आयपीेएलदरम्यान त्यांच्यावर परस्पर हितसंबधाबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. त्यामुळे त्यांनी या समीतीच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.
तसेच त्यांनी बीसीसीआयचे लोकपाल डी के जैन यांच्याशी बोलून स्पष्ट केले होते की त्यांना त्यांच्या भूमिकेबद्दल आणि कामाबद्दल कोणतीही स्पष्टता नाही.
पण बीसीसीआयच्या नवीन संविधानानुसार खंड 24 (5) मध्ये सांगण्यात आले आहे की सीइओ भारतीय संघासाठी अधिकाऱ्यांची निवड करु शकतात, तर मुख्य प्रशिक्षकाची निवड क्रिकेट सल्लागार समितीने करायची आहे. त्यामुळे बीसीसीआयला याबद्दल लवकरात लवकर निर्णय घ्यावा लागणार आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–२०११ला रस्त्यावर केले होते सेलिब्रेशन आता लॉर्ड्वर विश्वचषक उंचवण्यास उत्सुक आहे हा खेळाडू
–विश्वचषक २०१९: भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशी असे असेल हवामान
–विश्वचषक२०१९: संघ पावसामुळे तर आयसीसी नेटीझन्सच्या गमतीशीर प्रतिक्रियांमुळे हैरान