भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) याच्यासाठी मोहाली (Mohali Test) येथे होणारा कसोटी सामना अतिशय खास असणार आहे. हा त्याच्या कसोटी कारकिर्दीतील १०० वा सामना (Virat Kohli’s 100th Test) असेल. श्रीलंकेविरुद्ध ४ ते ८ मार्च दरम्यान हा सामना होणार आहे. तसेच या सामन्यातून जवळपास ७ वर्षांनंतर विराट केवळ फलंदाज म्हणून मैदानावर उतरणार आहे. तत्पूर्वी विराटचा भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांची नक्कल करतानाचा (Virat Kohli Mimicking Ravi Shastri) एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
विराट आणि शास्त्री यांची जोडगोळी सध्या वेगळी झाली आहे. परंतु त्यांनी गेली बरीच वर्षे एकत्र मिळून भारतीय कसोटी संघाला भरपूर यश प्राप्त करून दिले आहे. २०१५ ते २०२१ या ६ वर्षांच्या कालावधीत भारतीय कसोटी संघाचा कर्णधार राहिलेल्या विराटने प्रशिक्षक शास्त्रींबरोबर मिळून संघाला ऐतिहासिक विजय मिळवून दिले आहेत. हाच विराट शास्त्रींबरोबर मस्ती करताना दिसून आला आहे. खुद्द शास्त्रींनी त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
शास्त्रींनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर ‘ट्रेसर बुलेट चॅलेंज’चा व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओ कोहली शास्त्रींच्या प्रसिद्ध समालोचन वाक्य, ‘ट्रेसर बुलेट’ (खूप वेगाने निघणारी गोळी) ची नक्कल करतो आहे.
४ वर्षे भारतीय संघाचे प्रशिक्षक राहिलेले शास्त्री यांनी हा व्हिडिओ शेअर करत विराटला १०० व्या कसोटीनिमित्त शुभेच्छाही दिल्या आहेत. त्यांनी व्हिडिओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘विराट कोहलीच्या १०० व्या कसोटीला सेलिब्रेट करण्याची १०० वेगवेगळी कारणे असतील. हे खूप शानदार शतक असेल. मैदानावर त्याच्या शानदार खेळींना पाहण्याचा अनुभव खूप चांगला राहिला आहे. आता कव्हर्सवरून या चँपच्या खेळीचा आनंद लुटेल.’
https://www.instagram.com/tv/Cao_jXWNMoJ/?utm_source=ig_web_copy_link
विराट आणि शास्त्री जोडीच्या काळात भारतीय संघाने अनेक असाध्य कामगिरी करून दाखवल्या. परंतु त्यांना एकही आयसीसी स्पर्धा जिंकण्यात मात्र यश आले नाही. शास्त्रींनी भारतीय संघाचे प्रशिक्षकपद सांभाळल्यापासून भारतीय संघाने २०१७ चॅम्पियन्स ट्रॉफी अंतिम सामना, २०१९ विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना आणि विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना गमावला आहे. तसेच त्यांना प्रशिक्षण कारकिर्दीतील शेवटचा टी२० विश्वचषक २०२१ ही जिंकता आला नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
पुजारा-रहाणेला रिप्लेस करतील ‘हे’ खेळाडू? एकाला फक्त २ कसोटींचा अनुभव, पण आहे जबरदस्त लयीत
रोहितने दिले रहाणे-पुजाराच्या पुनरागमनाचे संकेत; म्हणाला…