पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडिअमवर न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात विश्वचषक 2023 स्पर्धेची 32वा सामना खेळला जात आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघ प्रथम फलंदाजीला उतरला आहे. यावेळी सलामीवीर फलंदाज क्विंटन डी कॉक चमकला आहे. त्याने खणखणीत षटकार मारून शतक साजरे केले. हे त्याचे वनडे कारकीर्दीतील 21वे शतक ठरले. हे शतक झळकावत त्याने विक्रमांची भिंतच उभी केली.
दक्षिण आफ्रिकेकडून सलामीला फलंदाजीसाठी उतरलेल्या क्विंटन डी कॉक (Quinton De Kock) याने 36व्या षटकातील अखेरच्या चेंडूवर षटकार मारला. यासह त्याचे शतक पूर्ण झाले. त्याने 103 चेंडूत 100 धावा करत शतक साजरे केले. यामध्ये 3 षटकार आणि 8 चौकारांचा समावेश होता. सामन्यात त्याने 116 चेंडू खेळले. त्यात त्याने 3 षटकार आणि 10 चौकारांच्या मदतीने 114 धावा केल्या. हे त्याचे वनडे विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धेतील चौथे शतक ठरले. या शतकासह त्याने विक्रमांचा पाऊस पाडला.
डी कॉकचा विक्रम
या शतकासह क्विंटन डी कॉक हा वनडे विश्वचषकाच्या एका हंगामात 4 किंवा त्याहून अधिक शतके करणारा जगातील तिसराच फलंदाज ठरला. या विक्रमाच्या यादीत अव्वलस्थानी रोहित शर्मा आहे. त्याने 2019 विश्वचषकामध्ये 5 शतके झळकावली होती. याव्यतिरिक्त यादीत दुसऱ्या स्थानी कुमार संगकारा असून त्याने 2015 विश्वचषकामध्ये 4 शतके झळकावली होती.
Quinton De Kock becomes the 3rd player in history to score 4 or more centuries in an edition of the World Cup. pic.twitter.com/eKYbw2Fgs9
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 1, 2023
याव्यतिरिक्त यादीत 4 फलंदाज असे आहेत, ज्यांनी विश्वचषकाच्या एका हंगामात 3 शतके झळकावण्याचा पराक्रम गाजवला होता. त्यामध्ये मार्क वॉ (1996 विश्वचषक), सौरव गांगुली (2003), मॅथ्यू हेडन (2007), डेविड वॉर्नर (2019) यांचा समावेश आहे.
डी कॉकची स्पर्धेतील कामगिरी
डी कॉकचा हा विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धेतील सातवा सामना आहे. त्याने या स्पर्धेत 500 धावांचा टप्पा पार केला आहे. तो अशी कामगिरी करणारा दक्षिण आफ्रिकेचा एकमेव फलंदाज आहे. त्याने या स्पर्धेत 90.83च्या सरासरीने 545 धावा केल्या आहेत. (record Quinton De Kock becomes the 3rd player in history to score 4 or more centuries in an edition of the World Cup)
हेही वाचा-
मोठी बातमी! ऑस्ट्रेलियाचं टेंशन वाढलं, अष्टपैलू मॅक्सवेलची मस्ती संघाला पडणार महागात
कहर! डी कॉकने वर्ल्डकपमध्ये घडवला इतिहास, दक्षिण आफ्रिकेच्या कुठल्याच फलंदाजाने केली नाही ‘अशी’ डेरिंग