भारत विरुद्ध श्रीलंका 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील शेवटचा सामना आज (7 ऑगस्ट) कोलंबो मैदानावर रंगला आहे. श्रीलंकेनं प्रथम फलंदाजी करताना भारतासमोर 249 धावांचं आव्हान ठेवलं आहे. तत्पूर्वी भारतीय संघाचा युवा खेळाडू रियान परागनं (Riyan Parag) आजच्या एकदिवसीय सामन्यात पदार्पण केलं होतं. त्यानं पदार्पण सामन्यातच 3 विकेट्स घेऊन एक शानदार रेकाॅर्ड त्याच्या नावावर केला.
रियान परागनं पदार्पण सामन्यात एकदिवसीय क्रिकेटमध्ये श्रीलंकेविरुद्ध पहिली विकेट मिळवली. परागनं 36व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर खेळपट्टीवर सेट झालेला खेळाडू अविष्का फर्नांडोला तंबूत पाठवलं. परागच्या चेंडूवर फर्नांडो एलबीडब्ल्यू बाद झाला. परागची ही आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमधील पहिली विकेट ठरली. यासह तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये पहिल्या विकेट्ससाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला बाद करणारा पहिला भारतीय खेळाडू बनला. परागनं फर्नांडोला 96 धावसंख्येवर बाद केलं.
श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात संधी मिळाल्यानंतर परागनं चमकदार गोलंदाजीचं प्रदर्शन दाखवलं. त्यानं 3 विकेट्स घेतल्या. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात तो भारतासाठी सर्वाधिक विकेट्स घेणारा खेळाडू ठरला. त्याच्या 3 विकेट्समध्ये सलामीवीर अविष्का फर्नांडो, कर्णधार चरिथ असलंका आणि दुनिथ वेल्लालागे यांचा समावेश आहे.
तिसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी दोन्ही संघ-
भारत- रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, रिषभ पंत (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, रियान पराग, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज
श्रीलंका- पाथुम निसांका, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस (यष्टीरक्षक), सदीरा समरविक्रमा, चरिथ असालंका (कर्णधार), जेनिथ लियानागे, कामिंडू मेंडिस, दुनिथ वेलालागे, महेश थीक्ष्णा, जेफ्री वेंडरसे, असिथा फर्नांडो
महत्त्वाच्या बातम्या-
INDvsSL: फर्नांडोचं झंझावाती अर्धशतक, निर्णायक सामन्यात भारतासमोर 249 धावांचं आव्हान
विनेश ऑलिम्पिकमधून बाहेर, आता ही कुस्तीपटू खेळणार अंतिम सामना; पराभवानंतरही लागली लॉटरी
IND vs SL: पंतच्या पुनरागमनानं चाहते खुश, तर केएल राहुलची उडवली थट्टा