ऑस्ट्रेलियाच्या मर्यादित षटकांच्या क्रिकेट संघाचा कर्णधार ऍरॉन फिंचने नुकतीच वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. न्यूझीलंडविरुद्ध तो आपला अखेरचा सामना खेळला. सततच्या खराब कामगिरीमुळे त्याला हा निर्णय घेणे भाग पडले. त्याच्या निवृत्तीनंतर ऑस्ट्रेलियाचा पुढील वनडे कर्णधार कोण होणार? याची चर्चा जोरात सुरू आहे. ऑस्ट्रेलियाला दोन विश्वचषक जिंकून देणारा कर्णधार रिकी पाँटिंग याने देखील या मुद्द्यावर आपले मत व्यक्त केले असून, त्याने कर्णधार म्हणून कोणाला पसंती देण्यात यावी याचा देखील उलगडा केला.
रिकी पॉंटिंग नुकताच आयसीसीच्या अधिकृत संकेतस्थळाशी बोलत होता. त्या मुलाखतीत त्याने अनेक मुद्द्यांवर आपली प्रतिक्रिया दिली. त्याला ऑस्ट्रेलियाच्या पुढील वनडे कर्णधाराविषयी विचारले असता तो म्हणाला,
The ICC Review 🔍
Ricky Ponting names who he thinks will be Australia’s next ODI skipper, who should replace Aaron Finch as opener and weighs in on the Warner leadership ban 👀
More 👇
— ICC (@ICC) September 19, 2022
“प्रामाणिकपणे सांगायचे झाले तर मला वाटते तो कर्णधार पॅट कमिन्स असावा. त्याच्याकडे सध्या कसोटी संघाचे नेतृत्व आहे आणि तो उत्कृष्टपणे संवादही साधू शकतो. तो सातत्याने वनडे संघात खेळत नसला तरी, त्याची इतरही कारणे आहेत. त्याला मोठ्या मालिकांसाठी व स्पर्धांसाठी तंदुरुस्त राहावे लागते. तरी देखील एकंदर विचार केल्यास तो कर्णधारपदासाठी योग्य पर्याय आहे.” पॉंटिंगने माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ व सलामीवीर डेव्हिड वॉर्नर हे देखील विचाराधीन असतील असे पुढे बोलताना म्हटले.
फिंचने निवृत्ती स्वीकारल्यानंतर कर्णधारपदासाठी काही नावे समोर येत आहेत. कसोटी संघाचा कर्णधार असलेला कमिन्स, अनुभवी स्मिथ व वॉर्नर यापैकी एका खेळाडूवर ही जबाबदारी देण्यात येऊ शकते असे सूत्रांकडून सांगण्यात येतेय. तसेच भविष्याचा विचार केल्यास यष्टीरक्षक ऍलेक्स केरी व अष्टपैलू प्लेन मॅक्सवेल यांचे नावही चर्चेत आहे. परंतु, क्रिकेट ऑस्ट्रेलिया टी20 विश्वचषकानंतरच या संपूर्ण प्रकरणावर चर्चा करेल असे सध्याचे चित्र आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
लज्जास्पद! फोटोसाठी राज्यपालांनी सुनील छेत्रीला केले बाजूला; भडकलेल्या चाहत्यांची धक्कादायक मागणी
कुस्तीपटू बजरंग पुनियाची कमाल, वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये ‘अशी’ कामगिरी करणारा ठरला पहिलाच भारतीय