येत्या १८ जून ते २२ जून दरम्यान भारत आणि न्यूझीलंड यांच्यात विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा थरार रंगणार आहे. या सामन्यासाठी दोन्हीही संघ कसून सराव करण्यात व्यस्त आहे. हा सामना इंग्लंडमधील साउथम्पटन स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे. त्यामुळे वेगवान गोलंदाजांना इथे मदत मिळू शकते. अशातच माजी भारतीय क्रिकेटपटू इरफान पठाण याने या सामन्यातील सहभागी क्रिकेटपटूंबद्दल आपले मत मांडले आहे.
साउथम्पटनच्या वेगवान गोलंदाजीस पोषक खेळपट्टीवर भारतीय संघाची सलामी जोडी संघर्ष करताना दिसू शकत असल्याचे इरफानने सांगितले आहे.
माजी भारतीय क्रिकेटपटू इरफानने स्टार स्पोर्ट्सच्या एका चर्चासत्रात म्हटले की, “मी नक्कीच रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांना पाठिंबा देईल. परंतु त्यांना कठीण परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो. कारण, त्यांच्यापुढील गोलंदाज त्यांना संकटात टाकू शकतात. एक गोलंदाज चेंडू आत आणायचे काम करेल; तर दुसरा गोलंदाज चेंडू बाहेर घेऊन जायचे काम करेल. दोघेही गोलंदाज खेळपट्टीच्या पुरेपूर वापर करून गोलंदाजी करतील.”
तसेच तो पुढे म्हणाला की, “शुबमन गिलला आयपीएल २०२१ स्पर्धेत साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले होते. परंतु हे क्रिकेटचे वेगळे स्वरुप आहे. त्याने ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत उत्कृष्ट कामगिरी केली होती. तुम्ही या गोष्टी लवकर विसरू शकत नाही.”
तर दुसरीकडे रोहित शर्माने देखील कसोटी क्रिकेटमध्ये धावा कराव्यात यासाठी माजी भारतीय क्रिकेटपटू पार्थिव पटेलने रोहितला पाठिंबा दिला आहे.
पार्थिवने म्हटले की, “तो (रोहित) सुरुवातीचा एक तास सतर्क राहण्याचा प्रयत्न करेल. रोहितने कसोटी क्रिकेटमध्ये ज्याप्रकारचा दृष्टीकोन दाखवला आहे, तो खरच चांगला आहे. तो चांगला खेळत आहे. आम्हाला त्याच्या पायांच्या हालचालीत बदल जाणवला आहे. म्हणून मला वाटते की त्याने कसोटी सलामीवीर म्हणूनही फार चांगले रुपांतर केले आहे. एकदा तो सेट झाला की, आम्हाला माहित आहे तो चांगले शॉट्स खेळतो. विश्वचषक स्पर्धेत त्याने वनडे क्रिकेटमध्ये ५ शतक लगावले होते. त्यामुळे त्याच्या डोक्यात असेलच की, १ तास सेट झाल्यानंतर मोठे फटके खेळावे.”
महत्त्वाच्या बातम्या-
टी२०चं मैदान गाजवणारे ‘हे’ शिलेदार प्रथमच खेळतायत पीएसएल, रिषभच्या धुरंधराचाही समावेश
इथेही कोहलीच ‘किंग’! WTCच्या विजेत्या संघाची बक्षीस रक्कम, विराटच्या आयपीएल मानधनापेक्षाही कमी
लिटल मास्टरच्या मते, ६०-७०चे दशक गाजवणारे ‘ते’ दिग्गज आजही जगातील सर्वोत्कृष्ट अष्टपैलू