भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्मासाठी २०१९ विश्वचषक फारच चांगला ठरला होता. या विश्वचषकात त्याने एक, दोन नाही तर तब्बल ५ शतके ठोकली होती. आणि याच ५ शतकांपैकी त्याने त्याच्या सर्वात आवडत्या शतकाबद्दल खुलासा केला आहे.
रोहितने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या पहिल्या सामन्यात १२२ धावांची खेळी केली होती. हीच खेळी त्याने आपली आवडती शतकी खेळी असल्याचे सांगितले आहे. रोहित ट्विटरवर चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरे देत होता, यादरम्यानच त्याला एका चाहत्याने हा प्रश्न विचारला होता.
रोहितने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून पोस्ट केलेल्या एका व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, “मागील वर्षी विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ठोकलेले शतक माझे आवडते शतक आहे. त्या सामन्यात फलंदाजीसाठी परिस्थिती अनुकूल नव्हती आणि दक्षिण आफ्रिकेची गोलंदाजी फारच शानदार होती.”
रोहितने कठीण परिस्थितीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ठोकले होते शतक
रोहितने २०१९ विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात १२२ धावांची शानदार शतकी खेळी केली होती. तरीही त्या सामन्यात भारतीय संघ २२७ धावांच्या छोट्या आव्हानाचा पाठलाग करत होता. परंतु परिस्थिती फलंदाजीसाठी योग्य नव्हती.
दक्षिण आफ्रिकेचे वेगवान गोलंदाज जबरदस्त गोलंदाजी करत होते. कागिसो रबाडा आपल्या फॉर्ममध्ये होता आणि त्याने रोहितला चांगलेच चिंतेत टाकले होते. इतकेच नाही तर रोहित सुरुवातीला बाद होण्यापासून वाचला होता. परंतु तो क्रीजवर टिकून राहिला आणि टिच्चून फलंदाजी केली. त्याने सावकाश आपली खेळी पुढे नेली आणि नाबाद शानदार शतक ठोकले. त्याच्या या खेळीमुळे भारतीय संघाने ६ विकेट्स आणि १५ चेंडू शिल्लक ठेवत सामना आपल्या खिशात घातला.
Q: @ImRo45 #askRo
Which 💯 is your favourite among 5 World cup centuries and why ?
– @DineshDinu1128— Rohit Sharma (@ImRo45) August 2, 2020
अनेक क्रिकेट तज्ज्ञदेखील हे मानतात की, रोहितची ही खेळी विश्वचषकातील त्याची सर्वोत्तम खेळी होती. याचे कारण असे की, खेळपट्टी ही गोलंदाजांसाठी अनुकूल असूनही रोहितने चांगली कामगिरी केली.
महत्त्वाच्या बातम्या-
-चेन्नई सुपर किंग्जला मिळालेले यश हे केवळ या खेळाडूमुळे, राहुल द्रविडने सांगितले नाव
-जगातील आजपर्यंतचा सर्वात महान क्रिकेटर, केल्या होत्या १९९ शतकांच्या मदतीने ६१७६० धावा
-चेन्नई सुपर किंग्जचे संकट वाढले, दुबईला जाणे झाले कठीण
ट्रेंडिंग लेख-
-आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या ५ बहीण-भावांच्या जोड्या…
-वनडे क्रिकेटमध्ये एका डावात सर्वाधिक चेंडू खेळणारे टॉप ५ फलंदाज….
-एकाच वनडे सामन्यात सलामीला फलंदाजी आणि गोलंदाजी करणारे ५ भारतीय खेळाडू…