आगामी टी 20 विश्वचषकात रविवारी (9 जून) झालेल्या कट्टर प्रतिस्पर्धी भारत पाकिस्तान सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानचा लाजीरवाणा पराभव केला. अटीतटीच्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर 6 धावांनी विजय मिळवला. केवळ 120 धावा डिफेंड करताना भारतीय गोलंदाजांनी पाकिस्ताच्या फलंदाजी यूनिटला दणका दिला, पाकिस्तान 20 षटकात केवळ 113 धावा काढू शकली.
India vs Pakistan. New continent, same result 😛
T20 may be a batters’ game, but in New York, bowlers were the Apple of our eyes today.
What a thrilling match! Great atmosphere and a wonderful exhibition of our great game in America. Well played, India 🇮🇳 😊#INDvPAK… pic.twitter.com/tdVVREclVp
— Sachin Tendulkar (@sachin_rt) June 9, 2024
भारताच्या ऐतिहासिक विजयानंतर टीम इंडियाचा माजी स्टार क्रिकेटपटू सचिन तेंडूलकरनी भारतीय संघाचे काैतूक केले, आणि पाकिस्तानला डिवचले आहे. तो सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाला, ‘जागा बदलली पण निकाल मात्र तोच’, असे ट्वीट करत पाकिस्तानला ट्रोल केले. भारतीय संघाने शेवटच्या षटकांत केलेल्या उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर 6 धावांनी सामना आपल्या नावे केला.
भारतीय संघाने टाॅस हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारताची सुरुवात निराशाजनक झाली, दुसऱ्या षटकात विराट कोहलीचा मोठा धक्का बसला, नसीम शहाने त्याला 4 धावांवर तंबूत पाठवले, रोहित शर्माही षटकार खेचण्याच्या प्रयत्नांत शहीन शहा अफ्रिदीच्या चेंडूवर बाद झाला, त्यानंतर रिषभ पंत व अक्षर पटेलनी संघास सावरत 39 धावांची महत्तवपूर्ण भागीदारी केली. पण पुन्हा नसीम शहाने अक्षर पटेलला बोल्ड करुन पाकिस्तानला सामन्यात पुनरागमन केले आणि टीम इंडियाला पाठोपाठ धक्के दिले भारतीय संघ 20 षटकेही खेळू नाही शकला आणि 119 धावावर सर्वबाद झाली. पंतने सर्वाधिक 42 धावा केल्या.
धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानने सावध सुरुवात केली. पण पाचव्या षटकात जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर सुर्यकुमारने बाबर आझमची स्लीप वर शानदार कॅच घेतली तो 13 धावांवर बाद झाला. भारतीय संघाने मधल्या फळीत कसून गोलंदाजी केली, ज्यामुळे शेवटच्या षटकांत पाकिस्तान संघ दबावात आला, ज्यामुळे टीम इंडियाने पाकिस्तानच्या हातात असेलेली मॅच खेचून आणली. जसप्रीत बुमराहच्या भेदक गोलंदाजी समोर पाकिस्तानच्या फलंदाजांनी गुडघे टेकले. 20 षटकात केवळ 113 धावाच काढता आल्या. बुमराहने 4 षटकात 14 धावा देत 4 विकेट्स घेतल्या तर हार्दिक पांड्याने 2 विकेट्स घेऊन बुमराहची चांगली साथ दिली.
महत्तवाची बातमी-
पाकिस्तानच्या पराभवानंतर ढसाढसा रडला नसीम शाह, मैदानावरचा व्हिडिओ व्हायरल
मोदींचा शपथविधी…पाकिस्तानचा पराभव…अन् जम्मू-काश्मीरमध्ये जल्लोष! पाहा सुंदर व्हिडिओ
टीम इंडियाच्या पाकिस्तावरील थरारक विजयाचे 3 हिरो, एका खेळाडूचं नाव कोणाच्याच तोंडी नाही