भारतीय संघ गुरुवारी (10 नोव्हेंबर) टी-20 विश्वचषक 2022 मधून बाहेर पडला. इंग्लंडविरुद्ध खेळलेल्या उपांत्य सामन्यात भारताला तब्बल 10 विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. पराभवानंतर 130 कोटी भारतीय चाहत्यांची निराशा झाली. सोबतच संघातील खेळाडू देखील चांगले नाराज असल्याचे पाहायला मिळाले. कर्णधार रोहित शर्मा याला पराभवामुळे अश्रू अनावर झाल्याचेही दिसले. रोहित डगआऊटमध्ये बसून रडतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला. त्यानंतर ड्रेसिंग रूममध्ये देखील रोहित असाच रडल्याचे सांगण्यात येत आहे.
भारतीय संघाला टी20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत इंग्लंडने एकतर्फी पराभूत केले. या पराभवानंतर कर्णधार रोहित शर्मा आपले अश्रू रोखू शकला नव्हता. सामना संपल्यानंतर तो डग आऊटमध्ये रडताना दिसला. त्यावेळी संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी त्याला समजावले. मात्र, ड्रेसिंग रूममध्ये पोहोचल्यानंतर त्याच्या अश्रूंचा पुन्हा एकदा बांध फुटला. तो ड्रेसिंग रूममध्ये अक्षरशः लहान मुलासारखा रडल्याचे सांगण्यात येते. हा पराभव रोहितच्या जिव्हारी लागला असे समजते. त्यावेळी रोहितला संघातील इतर खेळाडूंनी सावरले.
पराभवानंतर संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड व कर्णधार रोहित शर्मा यांनी खेळाडूंना संबोधित केले. रोहितने सर्व खेळाडूंचे आभार मानले. तसेच, आपण उत्कृष्ट खेळ केला केवळ एका सामन्यामुळे आपली मेहनत वाया गेली नाही असे त्याने म्हटले.
भारतीय संघ मायदेशी परतण्याकरिता विमानतळावर येण्याआधी संपूर्ण संघाची पुन्हा एक बैठक झाली. या बैठकीत सर्व खेळाडूंनी एकमेकांना आलिंगन दिले. त्यानंतरच खेळाडूंनी विमानतळाच्या दिशेने प्रवास सुरू केला. या संघातील काही खेळाडू केवळ मायदेशी परतणार आहेत. तर चार दिवसांनी सुरू होणाऱ्या न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेसाठी इतर खेळाडू न्यूझीलंडला रवाना होतील.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मोठी बातमी: आयसीसीला मिळाला नवा अध्यक्ष! ‘या’ व्यक्तीची बिनविरोध निवड
संदीप लामिछानेनंतर 46 आतंरराष्ट्रीय सामने खेळणारा करणार नेपाळचे नेतृत्व, टी20मध्ये विकेट्सही घेतल्या