जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना सध्या इंग्लंडमधील साऊथम्पटनच्या मैदानावर खेळवला जात आहे. भारत आणि न्यूझीलंडचे संघ या सामन्यात आमनेसामने आहेत. या दोन बलाढ्य संघातील सामन्यात चाहत्यांना दर्जेदार क्रिकेटची पर्वणी मिळते आहे. दोन्ही संघातील खेळाडू आपल्यातील सर्वोत्तम कौशल्याचे प्रदर्शन करत आहेत.
असाच एक क्षण सामन्याच्या पाचव्या दिवशी पाहायला मिळाला. भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने एका अप्रतिम चेंडूवर न्यूझीलंडचा फलंदाज बीजे वॅटलिंगला बाद केले. या विकेटसह त्याने भारताला सामन्यात पुनरागमन करुन दिले.
शमीचा भन्नाट चेंडू
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याच्या पाचव्या दिवसाला सुरुवात झाली तेव्हा न्यूझीलंडच्या २ बाद १०१ धावा होत्या. भारताच्या पहिल्या डावातील धावसंख्येपासून ते ११६ धावांनी पिछाडीवर होते. न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन आणि अनुभवी फलंदाज रॉस टेलरला यावेळी खेळपट्टीवर होते. या पहिल्या सत्रात भारतीय गोलंदाजांनी शिस्तबद्ध गोलंदाजीचे प्रदर्शन केले. मात्र त्यांना पहिल्या एका तासात विकेट घेण्यात यश आले नाही.
पण मोहम्मद शमीने ड्रिंक्स ब्रेकनंतर अनुभवी फलंदाज रॉस टेलरला बाद करत भारताला पाचव्या दिवसातील पहिले यश मिळवून दिले. त्यापाठोपाठ ईशांत शर्माने हेन्री निकोल्सला तंबूचा रस्ता दाखवला. यानंतर फलंदाजीला आलेल्या बीजे वॅटलिंगकडून न्यूझीलंडला मोठ्या अपेक्षा होत्या. पण शमीने त्याला एक लाजवाब चेंडूवर क्लीन बोल्ड केले. त्यामुळे वॅटलिंग अवघी एक धाव काढून माघारी परतला.
पाहा व्हिडिओ-
https://twitter.com/Abhi_Pawar_Ncp/status/1407321253510365186
Mohammad Shami 🔥🔥🔥
Clean bold #WTCFinal pic.twitter.com/OG082cz93H— Hemaram Saran (@saran_hemaram) June 22, 2021
शमीच्या या विकेटने भारताला सामन्यात पुनरागमन करुन दिले. वॅटलिंग स्वस्तात बाद झाल्याने न्यूझीलंडचा डाव ५ बाद १३५ अशा संकटात सापडला. त्यामुळे हा सामना आता दोलायमान अवस्थेत आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
WTC फायनल: पहिल्या षटकानंतर बुमराहला बदलावी लागली जर्सी, हे होते कारण
रोनाल्डोने कोको-कोलाच्या बॉटल हटवल्याच्या व्हिडिओवर करिना कपूरची ‘भन्नाट’ रिऍक्शन
स्टायलिश कॅप्टन कूल! पाहा धोनीच्या दहा हटके हेअरस्टाईल