प्रत्येक चाहता आपल्या आवडत्या क्रिकेटपटूला भेटण्यासाठी खूपच उत्सुक असतो. जेव्हा तो क्रिकेटपटूची भेट घेतो, तेव्हा ती भेट सदैव आठवणीत राहावी म्हणून त्याच्याकडून ऑटोग्राफ किंवा सेल्फी घेऊन ठेवतो. मात्र, अनेकदा चाहते हद्दच पार करतात, ज्याने क्रिकेटपटूलाही अस्वस्थ झाल्याशिवाय राहत नाही. असेच काहीसे रोहित शर्मा याच्यासोबत घडले आहे. आयपीएल 2023चा 69वा सामना मुंबई इंडियन्स वि. सनरायझर्स हैदराबाद संघात खेळला जात आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर पार पडत आहे. आता रोहित शर्माच्या चाहत्याचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओत एक पुरुष चाहता रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्याकडे सर्वांसमोर किस मागताना दिसत आहे. तसेच, चाहत्याला असे करताना पाहून रोहितच्याही भुवया उंचावतात.
हा व्हिडिओ मुंबई इंडियन्स वि. सनरायझर्स हैदराबाद (Mumbai Indians vs Sunrisers Hyderabad) संघातील सामन्याला सुरुवात होण्यापूर्वीचा आहे. सामन्यापूर्वी संघाचा कर्णधार रोहित या संघसहकाऱ्यांसोबत बसमध्ये जाताना दिसत आहे. यावेळी पुरुष चाहता रोहितला गालावर किस करण्यास सांगतो. चाहत्याची ही मागणी ऐकून रोहितही चकित होतो. आता रोहितची ही रिऍक्शन सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओत रोहितच्या चाहत्याचा वेडेपणा वेगळ्याच दर्जाचा असल्याचे दिसत आहे.
— Out Of Context Cricket (@GemsOfCricket) May 20, 2023
विशेष म्हणजे, मुंबई इंडियन्स संघ आयपीएल 2023 स्पर्धेतील अखेरचा साखळी सामना हैदराबादविरुद्ध खेळत आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वातील मुंबई आणि एडेन मार्करम याच्या नेतृत्वातील हैदराबाद संघ या सामन्यासाठी सज्ज झाले आहेत. या सामन्यात रोहितसेनेने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. यावेळी प्रथम फलंदाजीला उतरलेल्या हैदराबादने 11 षटकांचा खेळ संपेपर्यंत एकही विकेट न गमावता धावफलकावर 103 धावा लावल्या आहेत.
आता हैदराबाद संघ पुढे किती धावा करतो आणि त्यांचे आव्हान रोहितसेने पार करते की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (shocking ipl 2023 male fan ask for a kiss skipper rohit sharma give hilarious reaction video viral)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
तब्बल 4 वर्षांनंतर रिंकूने केला मोठा विक्रम, रोहित तर सोडाच; धोनी अन् डिविलियर्सलाही टाकलं मागे
अटीतटीच्या सामन्यात टॉसचा निकाल मुंबईच्या बाजूने, रोहितसेना हैदराबादला करणार का चीतपट?