नुकत्याच पार पडलेल्या सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेच्या अंतिम फेरीत पराभूत झाल्याने बडोद्याच्या संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. दिनेश कार्तिकच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या तामिळनाडूच्या संघाने बडोद्याचा सहज पराभव केला. मात्र या पराभवानंतरही बडोद्याच्या संघाचा कर्णधार कृणाल पंड्या संघाच्या कामगिरीवर समाधानी आहे. तसेच अष्टपैलू हार्दिक पंड्याने देखील संघाचे अभिनंदन केले आहे.
बडोद्याचा कर्णधार कृणाल पंड्याने वडिलांच्या निधनामुळे सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी अर्ध्यात सोडून माघार घेतली होती. मात्र तरीही बडोद्याने आपले मनोधैर्य खचू न देता अंतिम फेरी पर्यंत धडक मारण्याची कामगिरी केली. त्यांनी उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात हरियाणाचा तर उपांत्य फेरीच्या सामन्यात बलाढ्य अशा पंजाबच्या संघाचा पराभव केला.
संघाच्या याच कामगिरीने प्रभावित झालेल्या कृणाल पंड्याने टीमचा फोटो शेअर करत लिहिले, “सहकाऱ्यांनो, तुम्ही संपूर्ण स्पर्धेत उत्तम प्रदर्शन केले. आपण भरपूर पावले पुढे आलो असून अजून पुढचा टप्पाही आपल्याला गाठायचा आहे.”
Top effort boys! Superb performances in the tournament 👏 We’ve come a long way and there’s a long way to go! @cricbaroda pic.twitter.com/zWHBkzeXLV
— Krunal Pandya (@krunalpandya24) February 1, 2021
कृणालचा भाऊ हार्दिक पंड्या दुखापतीतून सावरत असल्याने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत संघाचा सदस्य नव्हता. मात्र त्यानेही ट्विट करत संघाचे अभिनंदन केले. तो म्हणाला, “सगळ्यांनीच उत्तम कामगिरी केली. तुम्हाला तुमच्या या कामगिरीबद्दल निश्चितच अभिमान वाटायला हवा.”
Well played, boys 👏 You should be proud of this achievement! @cricbaroda pic.twitter.com/sJkv8MEEYO
— hardik pandya (@hardikpandya7) February 1, 2021
दरम्यान, सोमवारी झालेल्या अंतिम सामन्यात बडोद्याच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात अवघ्या १२० धावा उभारल्या होत्या. केवळ विष्णू सोळंकीने ४९ धावा करत एकाकी झुंज दिली होती. १२१ धावांच्या सोप्या लक्ष्याचा पाठलाग तामिळनाडूने केवळ २ गडी गमावून पूर्ण केला. आणि त्यासह कोरोना महामारीनंतर खेळवल्या गेलेल्या पहिल्या देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले.
महत्वाच्या बातम्या:
आणि मार्क टेलर यांनी क्रिकेटचाहत्यांच्या मनात मिळवली जागा!
मुरली विजयने केले दिनेश कार्तिकचे अभिनंदन, ट्विटरवर आला चर्चेला उत
धोनीने संधी न दिलेल्या खेळाडूने गाजवली सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी