भारतीय महिला क्रिकेटपटू स्नेहा दीप्ती आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यासाठी कठोर सराव करत आहे. तसेच ती एक मोठा विक्रम आपल्या नावे करण्याच्या अगदी जवळ आली आहे. तिने आठ महिन्यांपूर्वीच मुलीला जन्म दिला आहे. अशातच तिची क्रिकेटमध्ये परतण्यासाठी धडपड सुरू आहे. जर तिने भारतीय संघात जागा पक्की केली तर ती एक विक्रम आपल्या नावे करणार आहे.
भारतीय संघाने स्नेहा दीप्तीला (Sneha Deepthi) निवडले आणि सामना खेळण्याची संधी दिली तर ती प्रेग्नेंसीनंतर भारतीय संघासाठी खेळणारी पहिली महिला क्रिकेटपटू ठरणार आहे. कोणी प्रेग्नेंसीनंतर क्रिकेट खेळले, असे भारतीय संघात आतापर्यंत झाले नाही.
स्नेहा ही कमी वयात भारतीय संघात पदार्पण करणारी महिला क्रिकेटर ठरली आहे. तिने २०१३मध्ये स्म्रिती मंधाना (Smriti Mandhana) हिच्यासोबत पदार्पण केले होते. त्यावेळी तिचे वय १६ वर्ष ६ महिने होते. तेव्हापासून तिने भारताकडून एक वनडे आणि दोन टी२० सामने खेळले आहेत.
स्नेहाने भारताकडून तिचा शेवटचा सामना बांगलादेश विरुद्ध १२ एप्रिल २०१३ला खेळला आहे. तिने तिचे तिन्ही सामने बांगलादेश विरुद्धच खेळले आहेत. त्यानंतर तिला काही संधी मिळालीच नाही.
View this post on Instagram
आंतरराष्ट्रीय स्तरावर जरी स्नेहाला संधी मिळाली नसली तरी तिने स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. अशा काळात तिने फिलीप मदीरालाशी लग्न केले आणि ती व्यस्त झाली. नुकतेच तिने मुलीला जन्म दिला असून तिचे नाव क्रिवा ठेवले आहेत.
आई बनल्यानंतरही स्नेहाने हार न मानता मैदानावर परतली आहे. जानेवारी २०१६ नंतर तिने थेट ऑक्टोबर २०२१ मध्ये स्थानिक क्रिकेट खेळले. तिला आंध्र प्रदेशच्या संघाचे कर्णधार करण्यात आले. या दरम्यान तिने हैद्राबाद विरुद्ध ५९ धावा केल्या.
स्नेहाने परतल्यावर म्हटले, “माझे वजन फारच वाढले होते. यामुळे मी कधीच खेळू शकणार नाही असे वाटले होते. नंतर खोल विचार केला आणि ठरवले नाही मी घरात नाही बसू शकत. मी माझे क्रिकेट आणि फलंदाजी नाही सोडू शकत. मी माझ्या फलंदाजीचे काही व्हिडिओही पाहिले. त्यातून मला आत्मविश्वास मिळाला की मी परत मैदानात जाऊन चौकार-षटकार मारले पाहिजे.”
तसेच स्नेहाने याच महिन्यात झालेल्या पहिल्या आंध्र प्रीमियर लीगमध्ये व्हाझनागरम रॉयल्सचे नेतृत्व करताना विजेतेपद मिळवून दिले आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
शास्त्री म्हणतायेत, “सचिनसारखा किडा आत्ताच्या टीम इंडियातील कोणातच नाही”
‘एका वनडेचा त्याला काय फायदा?’, भारताच्या माजी दिग्गजाचे मोठे वक्तव्य
‘नवनवीन पद्धतींनी पराभूत होतोय संघ’, तिसऱ्या वनडेपूर्वी विंडीज कर्णधाराची महत्वपूर्ण प्रतिक्रिया