भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात खेळल्या जात असलेल्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी 2023मध्ये भारतीय संघाचे पारडे जड आहे. भारताने पहिले दोन कसोटी सामने जिंकून मालिकेत 2-0ने आघाडी घेतली आहे. खरं तर, या दोन्ही कसोटी सामन्यात भारतीय फिरकीपटूंचा दबदबा राहिला आहे. ते फिरकीपटू म्हणजेच आर अश्विन आणि रवींद्र जडेजा होय. त्यांनी जबरदस्त गोलंदाजी करत पाहुण्या संघाच्या फलंदाजांच्या नाकी नऊ आणल्या आहेत.
दुसरीकडे, इंदोर येथे खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यात आर अश्विन (R Ashwin) याला इतिहास रचण्याची संधी आहे. अश्विन फक्त 2 विकेट्स घेताच भारतीय संघाच्या माजी दिग्गजाचा विक्रम मोडेल. याव्यतिरिक्त बॉर्डर-गावसकर ट्रॉफी (Border Gavaskar Trophy) स्पर्धेत शानदार कामगिरी करत अश्विनचे लक्ष्य अनिल कुंबळे (Anil Kumble) याचा मोठा विक्रम मोडण्यावर आहे.
इंदोर कसोटीत 2 विकेट्स घेताच अश्विन मोडणार कपिल देव यांचा विक्रम
खरं तर, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील तिसऱ्या कसोटी सामन्याला 1 मार्चपासून इंदोरच्या होळकर स्टेडिअममध्ये सुरुवात होणार आहे. या कसोटीत भारतीय संघाचा अनुभवी फिरकीपटू आर अश्विन फक्त 2 विकेट्स घेताच माजी भारतीय कर्णधार कपिल देव (Kapil Dev) यांचा मोठा विक्रम मोडीत काढेल.
कपिल देव यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 687 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच, अश्विनच्या नावावर 686 विकेट्स आहेत. अशात अश्विन इंदोर कसोटीत 2 विकेट्स घेताच कपिल देव यांच्या विक्रमाला तडा देण्यासोबतच भारताकडून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय विकेट्स घेणारा तिसरा गोलंदाज बनेल.
अनिल कुंबळेच्या महाविक्रमावर अश्विनची नजर
भारताचा फिरकीपटू आर अश्विन याने तिसऱ्या कसोटीत 9 विकेट्स घेतल्या, तर तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक 112 विकेट्स घेणारा भारतीय गोलंदाज बनेल. यापूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक कसोटी विकेट्स घेण्याचा कारनामा भारतीय दिग्गज फिरकीपटू अनिल कुंबळे याच्या नावावर आहे. त्याने 111 कसोटी विकेट्स घेतल्या आहेत. अशात अश्विन कुंबळेचा विक्रम मोडून ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक कसोटी विकेट्स घेणारा भारतीय गोलंदाज बनेल. सध्या अश्विनच्या नावावर 103 कसोटी विकेट्स आहेत. (spinner r ashwin will create history in border gavaskar trophy test series 2023 read here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘या’ ऑस्ट्रेलियन खेळाडूने अजिंक्य रहाणेला मागितली मदत, फलंदाजी पाहून झालेला हैराण
चालू सामन्यात गोलंदाजाला मारण्यासाठी धावला बाबर आझम; ऍक्शन कॅमेऱ्यात कैद, डिलीट होण्यापूर्वी पाहा व्हिडिओ