भारतीय संघाविरुद्ध झालेल्या मर्यादित षटकांच्या मालिकेनंतर श्रीलंका संघ दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध मायदेशात सामने खेळणार आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध श्रीलंका संघाला ३ एकदिवसीय सामन्यांची मालिका आणि ३ टी२० मालिका सामन्यांची मालिका खेळायची आहे.
विशेष म्हणजे सप्टेंबर महिन्यात श्रीलंकेत दोन द्विपक्षीय मालिका खेळल्या जाणार आहेत. म्हणजेच आणखी दोन देश श्रीलंकेत आपले सामर्थ्य दाखवण्याची तयारी करत आहेत. अशाप्रकारे सप्टेंबर महिन्यात श्रीलंकेमध्ये क्रिकेटमय वातावरण असणार आहे. यामागचे मुख्य कारण म्हणजे टी२० विश्वचषक स्पर्धा सुरू होण्यापूर्वी श्रीलंका संघाला स्वतःला पूर्णपणे तयार करून घ्यायचे आहे.
दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेत २-१४ सप्टेंबरपर्यंत मर्यादित षटकांची मालिका खेळण्याचे नक्की केले आहे, ज्यामध्ये ३ एकदिवसीय सामने आणि ३ टी२० सामने खेळले जाणार आहेत. ऑक्टोबर महिन्यात सुरू होणाऱ्या टी२० विश्वचषकाच्या दृष्टीने या सर्व क्रिकेटच्या मालिका खेळणे अत्यंत महत्त्वाचे असणार आहे.
सामने कोलंबोमध्ये खेळेल जातील
क्रिकेट दक्षिण आफ्रिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी फोलेत्सी मोसेकी यांनी शुक्रवारी सांगितले की, “मायदेशात एका चांगल्या विरोधी संघासोबत खेळणे हे टी२० विश्वचषक स्पर्धेच्या तयारीच्या दृष्टीने आमच्या संघाला फायद्याचे ठरणार आहे. या कालावधीत ही मालिका आयोजित केल्याबद्दल आम्ही श्रीलंका क्रिकेटचे आभारी आहोत. दक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंका यांतच्यातील दोन्ही मालिका कोलंबोच्या आर प्रेमदासा आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या जाणार आहेत.”
द्विपक्षीय मालिकेत पाक-अफगाण प्रथमच समोरासमोर
श्रीलंकेच्या हंबनटोटा येथे अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यात दुसरी द्विपक्षीय मालिका खेळली जाणार आहे. युएईमध्ये आयपीएल २०२१ चे उर्वरित सामने आयोजित केल्यामुळे पाकिस्तान आणि अफगाणिस्तान संघामध्ये होणाऱ्या सामन्याचे मैदान बदलावे लागले आहे. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचे मीडिया मॅनेजर हेक्मत हसन म्हणाले होते, “होय, आम्ही पाकिस्तानविरुद्ध श्रीलंकेत एकदिवसीय मालिकेचे आयोजन करणार आहोत.”
पाकिस्तान आणि अफगाणिस्तान संघात ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका श्रीलंकेत खेळली जाणार आहे. कारण यूएईमध्ये आयपीएल २०२१ च्या उर्वरित सामन्याचे आयोजन केल्यामुळे ही मालिका आयोजित करण्यास असमर्थता दाखवली गेली आहे. अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील ही पहिली द्विपक्षीय मालिका असेल. ही मालिका १ ते ५ सप्टेंबर दरम्यान हंबनटोटा येथे खेळली जाणार आहे.
यूएईमध्ये १९ सप्टेंबरपासून आयपीएल २०२१ चे उर्वरित सामने आयोजित केले गेले आहेत. हे सामने १४ ऑक्टोंबरपर्यंत चालणार आहेत. त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये युएईसह ओमानकडे टी२० विश्वचषक स्पर्धेचे सह-यजमानपद असणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
लंडनमध्ये विराटची पत्नी अनुष्का बनली फोटोग्राफर; ‘या’ अंदाजातील फोटो केले क्लिक
टी२० विश्वचषकासाठी सलामीवीर म्हणून शिखर आणि राहुलमध्ये चढाओढ, पाहा कोण आहे आकडेवारीत सरस?
नवदीप सैनीच्या खांद्याचे होणार स्कॅन, दुसऱ्या टी२० सामन्यात क्षेत्ररक्षण करताना झाली होती दुखापत