आतापर्यंत क्रिकेटविश्वात अनेक खेळाडू होऊन गेले आहेत. अनेक खेळाडूंनी क्रिकेटविश्वात आपल्या खेळीने वर्चस्व गाजवले आहे. परंतु प्रत्येकाच्या दृष्टीने त्यांना त्यांचा आवडता खेळाडू महान वाटतो. अगदी जगभरातील महान फलंदाजांमध्ये गणले जाणारे सुनील गावस्कर यांनीही सर्वोत्तम खेळाडूविषी आपले मत मांडले आहे. सुनील गावस्कर यांनी आपल्या दृष्टीने जगातील सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू कोण आहे? हे सांगितले आहे.
लिटल मास्टर सुनील गावस्कर यांनी त्या क्रिकेटपटूला आजच्या काळातील सर्वोत्कृष्ट अष्टपैलू असे वर्णन केले आहे, जो ६० ते ७० च्या दशकातील महान अष्टपैलू म्हणून ओळखला जायचा. आम्ही वेस्ट इंडीजचा महान क्रिकेटपटू सर गॅरफिल्ड सोबर्सबद्दल बोलत आहोत.
सुनील गावस्कर यांनी गॅरी सोबर्सला सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू म्हणून निवडले
भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी वेस्ट इंडिजचे सर गॅरफिल्ड सोबर्स यांना जगातील सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू म्हणून संबोधले.
सुनील गावस्कर आपल्या एका मुलाखतीत म्हणाले, “सोबर्स माझ्या मते जगातील सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू होता. त्याच्याकडे कोणत्याही वेळी गोलंदाजी किंवा फलंदाजीने सामना बदलण्याची शक्ती होती. इतकेच नाही तर क्षेत्ररक्षणादरम्यानही त्याने शानदार झेल घेवून सामना फिरवण्यात तज्ञ म्हणून काम पाहिले. त्याच्या खेळावर प्रचंड परिणाम झाला आणि त्याने फलंदाजी आणि गोलंदाजीद्वारे अनेक सामन्यांमध्ये एकट्याने आपल्या संघाला विजय मिळवून दिला. म्हणूनच मी त्याला जगातील आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू मानतो.” सुनील गावस्कर म्हणाले की, आजही त्यांना सर गॅरीशिवाय दुसरा उत्कृष्ट अष्टपैलू दिसत नाही.
सर गॅरफिल्ड सोबर्सचे अष्टपैलू खेळाडू म्हणून वर्णन करण्याबरोबरच त्यांनी चेन्नईत वेस्ट इंडीजविरुद्ध १९७८ मध्ये झालेल्या कसोटी सामन्याची आठवणही केली. आपल्या कसोटी कारकीर्दीत १०,००० पेक्षा अधिक धावा करणारे सुनील गावस्कर म्हणाले, “१९७८ मध्ये चेन्नई येथे वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी सामन्यातील खेळपट्टी अशी होती की मला फलंदाजी करणे खूप कठीण झाले. मी वेस्ट इंडीजमधील सबिना पार्क येथे फलंदाजी केली. जेथे चेंडू आपल्या डोक्यावर उडत राहतो. ऑस्ट्रेलियाचा बाउन्सी पर्थ खेळपट्टी आणि गब्बा जिथे चेंडू आपल्या दिशेने वेगाने येतो. पण मी फलंदाजी केली आहे. पण चेन्नईची खेळपट्टी मला सर्वात वेगवान खेळपट्टी वाटली.”
भारतीय संघाला सावधगिरी बाळगण्याचा दिला सल्ला
इंग्लंडला रवाना होण्यापूर्वी सुनील गावस्कर यांनी यजमान संघाविरूद्ध सावधगिरी बाळगण्याचा इशारा भारतीय संघाला दिला होता. सुनील गावस्कर म्हणाले होते की, “भारतातील पराभवानंतर इंग्लंडला मोठी दुखापत झाली आहे. अशा परिस्थितीत भारतीय संघाला वेगवान खेळपट्टी मिळू शकेल.”
महत्वाच्या बातम्या
आयसीसीकडून विनू मंकड यांना मोठा सन्मान; ५ युगांतील १० दिग्गजांचा ‘हॉल ऑफ फेम’मध्ये समावेश
रॉस टेलर ३७व्या वर्षीही पाडतोय धावांचा पाऊस, ‘या’ विक्रमात टाकले कोहलीला मागे
कसोटी अजिंक्यपद फायनलमध्ये कोहली निभावणार कामचलाऊ गोलंदाजाची भूमिका? ‘या’ व्हिडिओतून मिळाले संकेत