भारतात सध्या इंडियन प्रीमीयर लीगचा चौदावा हंगाम सुरु आहे. या हंगामातील आतापर्यंत २१ सामने पार पडले आहेत. अशातच या हंगामाच्या सुरुवातीच्या टप्प्यातच सनरायझर्स हैदराबादला मोठा धक्का बसला होता. आयपीएलमध्ये हैदराबादचे प्रतिनिधित्व करत असलेला वेगवान गोलंदाज टी नटराजन दुखापतीमुळे केवळ २ सामने खेळून उर्वरित आयपीएलच्या चौदाव्या हंगामातून बाहेर झाला होता. आता त्याच्या दुखापतीबद्दल मोठी अपडेट पुढे येत आहे.
गुडघ्याला झालेल्या दुखापतीमुळे नटराजनने आयपीएल २०२१ मधून माघार घेतली होती. मंगळवारी (२७ एप्रिल) त्याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. स्वत: नटराजनने सोशल मीडियाद्वारे यासंदर्भात माहिती दिली आहे.
त्याने ट्विट करत लिहिले आहे की, ‘आज माझ्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. मेडिकल सर्जन्स, डॉक्टर, नर्स आणि त्यांच्या पूर्ण स्टाफचे आभार. याबरोबरच बीसीसीआय आणि माझ्यासाठी प्रार्थना करणाऱ्या सर्वांचे मनापासून आभार.’
Today, I underwent knee surgery- and am grateful for the expertise, attention and kindness of the medical team, surgeons, doctors, nurses and staff. I’m grateful to @bcci and to all that have wished well for me. pic.twitter.com/Z6pmqzfaFj
— Natarajan (@Natarajan_91) April 27, 2021
नटराजनला गुडघ्याची दुखापत ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान झाली होती. त्यानंतर तो राष्ट्रीय क्रिकेट अकादमी, बंगळुरु येथे देखील दाखल झाला होता. मात्र या दुखापतीने आयपीएलदरम्यान पुन्हा डोके वर काढल्याने त्याला शस्त्रक्रिया करावी लागली आहे.
आयपीएल २०२० मुळे आला होता प्रकाशझोतात
टी नटराजन आयपीएल २०२० च्या हंगामादरम्यान प्रकाशझोतात आला होता. त्याने या हंगामात भुवनेश्वर कुमारची कमी भरुन काढत हैदराबादकडून १६ आयपीएल सामन्यांत १६ बळी घेतले होते. या दरम्यान त्याची सरासरी ३१.५ अशी होती. त्याने एका हंगामात सर्वाधिक ६५-७० यॉर्कर चेंडू फेकले आहेत.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यातही नटराजन चमकला
नटराजनने २०२०-२१ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील तिन्ही क्रिकेट प्रकारात पदार्पण केले आहे. तो एकाच दौऱ्यात तिन्ही क्रिकेट प्रकारात पदार्पण करणारा पहिला भारतीय खेळाडू आहे. खरंतर त्याची या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी नेट गोलंदाज म्हणून निवड झाली होती. मात्र भारतीय संघाचे खेळाडू सातत्याने दुखापतग्रस्त होत असल्याने त्याला तीन्ही क्रिकेट प्रकारात पदार्पणाची संधी मिळाली. या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्याने १ वनडे, ३ टी२० आणि १ कसोटी सामना खेळताना एकूण ११ विकेट्स घेतल्या.
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएल लिलावात मिळाला नाही खरेदीदार, चेन्नईनेही दिला डच्चू; आता मुंबईसाठी बजावणार ‘ही’ भूमिका
पत्नीच्या दिलखेचक अदांनी हार्दिकची पुन्हा एकदा पाडली विकेट, प्रेम व्यक्त करत दिली ‘ही’ प्रतिक्रिया