गुरुवारी (१ ऑक्टोबर) अबू धाबी येथे किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात आयपीएल २०२०चा १३वा सामना पार पडला. या सामन्यात मुंबई संघाने ४८ धावांनी विजय मिळवला. हा मुंबई संघाचा या हंगामातील दूसरा विजय होता. दरम्यान पंजाब संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने त्याच्या शानदार थ्रोने चाहत्यांची मने जिंकली. त्याच्या थ्रोचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
झाले असे की, पंजाब संघाचा कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकत सुरुवातीला क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मुंबई संघाने प्रथम फलंदाजी करताना दमदार प्रदर्शन केले. त्यांनी २० षटकात ४ विकेट्स गमावत १९१ धावा केल्या. यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्माच्या सर्वाधिक ७० धावांची समावेश होता. त्याने ४५ चेंडूत ८ चौकार आणि ३ षटकार मारत हा आकडा गाठला होता. तर कायरन पोलार्ड (४७), हार्दिक पंड्या (३०) यांनी महत्त्वाचे योगदान दिले होते.
दरम्यान सलामीला फलंदाजीसाठी आलेला मुंबईचा फलंदाज क्विंटन डी कॉक पहिल्याच षटकात खाते न उघडता पव्हेलियनला परतला. त्यामुळे सूर्याकुमार यादव तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी मैदानावर उतरला. पंजाबचा कर्णधार राहुलने सामन्यातील चौथे टाकण्यासाठी युवा गोलंदाज रवी बिश्नोईला पाठवले. त्याने षटकातील पाचवा चेंडू टाकला आणि स्ट्राईकवर असणाऱ्या रोहित चेंडूला हिट करत एक धाव घेण्यासाठी धावला. त्यामुळे नॉन स्ट्राईकर बाजूला उभ्या असणाऱ्या सूर्याकुमारनेही वेगाने धाव घेतली.
तेवढ्यात शमीने चेंडू पकडला आणि आपल्या रॉकेट थ्रोने सूर्यकुमारला धावबाद करत मुंबईला मोठा झटका दिला. शमीचा हा शानदार थ्रो चाहत्यांना भलताच आवडला आहे. शमीच्या या थ्रोचा व्हिडिओ आयपीएलने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे.
WATCH – Shami hits the bullseye 🎯
Collect, aim, hit – Outstanding throw from @MdShami11 to dismiss Suryakumar Yadav.https://t.co/1ZPQYMnx2c #Dream11IPL #KXIPvMI
— IndianPremierLeague (@IPL) October 1, 2020
That direct hit by Shami and Suryakumar has to depart.#MI 22/2 after 4 overs https://t.co/3c3pFq0ViC #Dream11IPL #KXIPvMI pic.twitter.com/XfFo8V0WL6
— IndianPremierLeague (@IPL) October 1, 2020
असे असले तरी, शमीने मुंबईविरुद्धच्या सामन्यात अतिशय महागडी गोलंदाजी केली. त्याने ४ षटकात तब्बल ३६ धावा देत केवळ १ विकेट चटकावली.
महत्त्वाच्या बातम्या-
अप्रतिम! मॅक्सवेलने घेतला अचंबित करणारा झेल, पाहा व्हिडिओ
“…म्हणून तुम्हाला असाच कर्णधार हवा असतो”, युजवेंद्र चहलने विराटचे केले तोंडभरून कौतुक
चॅम्पियन खेळाडू बेन स्टोक्स कधी करणार पुनरागमन? शेन वॉर्नने दिली ‘ही’ माहिती
ट्रेंडिंग लेख-
गळ्यात २५ तोळ्याची सोन्याची चैन घालून गोलंदाजी करणारा भारताचा प्रविण कुमार
IPL २०२० : मुंबई आणि पंजाब सामन्यात झाली तब्बल ८ विक्रमांची नोंद
‘या’ तीन कारणांमुळे किंग्ज इलेव्हन पंजाबला पाहावे लागले पराभवाचे तोंड