आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या जागतिक कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यात भारतीय संघाला न्यूझीलंड संघाकडून पराभव पत्करावा लागला. या पराभवामुळे भारतीय चाहते खूप नाराज झाले आहेत. या सामन्याला आठवडा उलटून गेला असला तरीही सोशल मीडियाद्वारे भारतीय संघावर टीका केली जात आहे. भारतीय संघाची तुलना दक्षिण आफ्रिकेशी केली जात असून भारतीय संघाला चोकर्सचा दर्जाही देण्यात येत आहे. परंतु भारताचा कर्णधार विराट कोहली हा पराभव विसरून सुट्ट्यांचा आनंद लुटत आहे.
विराटची पत्नी अनुष्का शर्मा हिने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तो खूप आनंद दिसून येत आहे.
अनुष्का सोबत रोमँटिक डेट
विराट आणि अनुष्का 28 जूनला सकाळी रोमँटिक डेटवर गेल्याचे दिसून आले. अनुष्काने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर यावेळचा फोटो शेअर केला, ज्यामध्ये ती विराटसोबत कॉफी पिताना दिसत आहे. हा फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘जेव्हा आपण क्विक नाष्टामध्ये सहभागी व्हाल आणि तुम्हाला विजेता असल्यासारखे वाटेल.’
https://www.instagram.com/p/CQqXc6gpLOJ/?utm_medium=copy_link
आयसीसी स्पर्धेमध्ये विजयी होण्यात अपयशी विराट
आयसीसीच्या कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यामध्ये भारतीय संघाचा पराभव झाल्यानंतर विराट कोहलीवर जोरदार टीका होत आहे. भारतीय संघासाठी ही तिसरी आयसीसीची स्पर्धा होती, ज्यामध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला पराभव पत्करावा लागला. या अगोदर विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली 2017 चॅम्पियन्स ट्रॉफी आणि एकदिवसीय विश्वचषक 2019 मध्ये भारतीय संघाला पराभवाला सामोरे जावे लागले होते.
कसोटी अजिंक्यपद स्पर्धेनंतर भारतीय संघाला इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. या मालिकेपुर्वी भारतीय संघाला जवळपास १ महिन्याचा रिकामा कालावधी मिळाला आहे. त्यामुळे बीसीसीआयने क्रिकेटपटूंना काही दिवसांची सुट्टी दिली आहे. यादरम्यान क्रिकेटपटू आपल्या कुटुंबीयांसह इंग्लंडमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सुट्ट्यांचा आनंद लुटत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
अजबच! WTC फायनलचं टेंशन घेऊन चक्क बाथरुममध्ये लपला होता जेमिसन, वाचा मजेदार किस्सा
अरेरे! २४ वर्षीय क्रिकेटपटूचं फुटकं नशीब, बड्डे दिवशी पदार्पण केलं; पण शून्यावर तंबूत परतला
अश्विन-मितालीला मिळाले खेलरत्न पुरस्काराचे नामांकन, अर्जुन अवॉर्डसाठी ‘या’ ३ नावांची शिफारस