क्रांतीज्योत महिला प्रतिष्ठान युवा कबड्डी सिरीज मध्ये आज प्ले-ऑफसच्या पहिल्या दिवशी क्वालीफायर 1 व 2 आणि एलिमीनेटर 1 व 2 हे सामने झाले. नांदेड चांबल चॅलेंजर्स संघाने क्वालीफायर 1 मध्ये ठाणे संघाला नमवत तर मुंबई शहर मौर्य मेवरीक्स संघाने क्वालीफायर 2 मध्ये मुंबई उपनगर संघाला नमवत या दोन संघांनी अनुक्रमे क्वालीफायर 3 व 4 खेळण्यासाठी आपली जागा निश्चित केली. एलिमीनेटर 1 व 2 मध्ये पुणे व रायगड संघ पराभूत झाल्याने त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.
क्वालीफायर 1 मध्ये नांदेड चांबल चॅलेंजर्स संघाने ठाणे हम्पी हिरोज संघावर अटीतटीच्या लढतीत 39-36 अशी मात दिली. मध्यंतराला 16-18 असा पिछाडीवर असलेल्या नांदेड संघाने दुसऱ्या हाफ मध्ये मात्र आक्रमक खेळ करत ठाणे संघाला चांगली टक्कर दिली. अक्षय सूर्यवंशी व अजित चव्हाण यांच्या सुपर टेन कामगिरीने नांदेड संघाने हा सामना जिंकला. क्वालीफायर 2 मध्ये मुंबई शहर मौर्य मेवरीक्स अटीतटीच्या लढतीत 33-31 असा मुंबई उपनगर मुर्थाल मॅग्नेट्स संघावर विजय मिळवला. मुंबई उपनगरच्या शेवटच्या चढाईत रजत सिंग ची रुपेश साळुंखे ने पकड करत सामना मुंबई शहराच्या बाजूने झुकवला. मुंबई शहर कडून शार्दूल पाटील ची खेळी निर्यायक ठरली.
पुणे पलानी टस्कर्स विरुद्ध पालघर काझीरंगा रहिनोस यांच्यात एलिमीनेटर 1 सामना अंत्यत चुरशीचा झाला. मध्यांतराला 20-12 अशी आघाडी पालघर संघाकडे होती. त्यानंतर मात्र भूषण तपकीरच्या आक्रमक खेळीने पुणे संघाने सामन्यात चुरस निर्माण केलेली सामन्याचा संपूर्ण वेळेत सामना 35-35 असा बरोबरीत राहिलेला त्यानंतर 3-3 मिनिटाच्या अतिरिक्त वेळेत पालघर संघाने 44-41 असा विजय मिळवला. पालघर संघाच्या विजयात राहुल सवर हिरो ठरला. तर एलिमीनेटर सामन्यात नाशिक द्वारका डिफेंडर्स संघाने 44-36 असा रायगड मराठा मार्वेल्स संघावर विजय मिळवला. नाशिक कडून आकाश शिंदे ने 14 गुण मिळवले तर ईश्वर पठाडेची सुपर रेड सामन्याचा निर्यायक क्षण ठरला. (The first day of the play-offs saw fierce battles)
उद्याचे प्ले-ऑफस सामने-
क्वालीफायर 3 – अहमदनगर पेरियार पँथर्स विरुद्ध नांदेड चांबल चॅलेंजर्स
क्वालीफायर 4 – कोल्हापूर ताडोबा टायगर्स विरुद्ध मुंबई शहर मौर्य मेवरीक्स
एलिमीनेटर 3 – ठाणे हम्पी हिरोज विरुद्ध पालघर काझीरंगा रहिनोस
एलिमीनेटर 4 – मुंबई उपनगर मुर्थाल मॅग्नेट्स विरुद्ध नाशिक द्वारका डिफेंडर्स
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
एलिमीनेटर 1 – टाय ब्रेकर नंतर पालघर काझीरंगा रहिनोसने अतिरिक्त वेळेत मारली बाजी, पुण्याचे आव्हान संपुष्टात
WTC Final आधी टीम इंडियाचे वाढले टेन्शन! आयसीसीच्या ‘त्या’ निर्णयाने ऑस्ट्रेलिया खुश