क्रिकेटमध्ये अत्यावश्यक वस्तूंपैकी एक म्हणजे हेल्मेट. अनेकदा क्रिकेटपटू चेंडूपासून वाचवण्यासाठी हेल्मेट घालत असतात. क्रिकेटमध्ये फलंदाज शक्यतो फक्त वेगवान गोलंदाजांविरुद्ध हेल्मेट घालतात. पण आता मेरिलबन क्रिकेट क्लबने म्हटले आहे की फलंदाजांनी प्रत्येक गोलंदाजाविरुद्ध हेल्मेट घातले पाहिजे, जेणेकरुन कन्कशन होण्यापासून ते वाचू शकतील.
इंग्लंडमध्ये २०१६ सालापासून आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत सामन्यांमध्ये हेल्मेट घालणे अनिवार्य आहे. मात्र, हे भारतासह अनेक देशांमध्ये अनिवार्य नाही. त्यामुळे एमसीसीचे अध्यक्ष जॉन स्टेफन्सन यांनी म्हटले आहे की काही या गोष्टी बदलणे गरजेचे आहे.
त्यांनी म्हटले की विराट कोहलीसारखे खेळाडू दुखापतीपासून वाचू शकतात. तसेच प्रत्येकाला हे वेगळ्यापद्धतीने समजवावे लागणार आहे आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद याचा कशाप्रकारे विचार करतील हे देखील पाहावे लागेल. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हेल्मेट घालणे हे अनिवार्य केले पाहिजे. विराट त्याला वाटेल तेव्हा तो हेल्मेट काढून कॅप घालू शकतो, तर इंग्लंडच्या खेळाडूंना कायमच हेल्मेट घालावे लागते. ते टोपी घालू शकत नाही.
याबरोबरच स्टिफन्सन म्हणाले, ते याबाबत आयसीसीशी चर्चा करणार आहेत. कारण जेव्हा तुम्ही स्विपचा फटका खेळता आणि तुम्ही टोपी घातली असेल तर चेंडू तुमच्या डोक्याला लागू शकतो. याबाबात विचार करण्याची गरज आहे. कसोटी क्रिकेटमध्ये हेल्मेट घालणे अनिवार्य करायला हवे. आयसीसीने सर्व देशांसाठी हा निर्णय घेण्यास तयारी दाखवायला हवी.
तसेच एमसीसी आखुड टप्प्याच्या चेंडूबाबातही जगभरात चर्चा करत आहे. गोलंदाजांना बाऊंसर चेंडू टाकण्यासाठी उंचीबाबात नियम घालून दिले आहेत. पण मागील काही महिन्यात अनेक खेळाडू दुखापतग्रस्त झाल्याने आखुड टप्प्याच्या चेंडूवर बंदी घालण्याबाबत वाद होत आहेत. पण अशा प्रकारे बंदी घातली जाण्याची शक्यता कमी आहे. याबाबतचा अंतिम निर्णय एमसीसी डिसेंबरमध्ये होणाऱ्या बैठकीत घेईल.
सध्या क्रिकेटपटूच्या डोक्याला किंवा मानेला चेंडू लागला तर कन्कशन सब्सटिट्यूट वापरता येतो. हा नियम मागील काही वर्षापासून क्रिकेटमध्ये वापरला जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
ब्रेकिंग! इंग्लंड विरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर, पाहा संपूर्ण यादी
“आयपीएलच्या आधी स्मिथच्या मांसपेशींमध्ये ताण आल्यास आश्चर्य वाटू नये”, दिग्गजाचा मोठा दावा