कोरोना महामारीमुळे बंद असलेले क्रिकेट जगत पुन्हा नव्याने सुरू झाले आहे. पुरुष क्रिकेटच्या अनेक महत्त्वाच्या स्पर्धा आणि मालिका खेळल्या जात असताना, महिला क्रिकेट अजूनही पूर्वपदावर आले नाही. त्याच अनुषंगाने माजी भारतीय महिला क्रिकेटपटू अंजुम चोप्रा यांनी परखड मत मांडले आहे. महिला क्रिकेटविषयी बीसीसीआयमध्ये स्पष्टतेचा अभाव असल्याचे त्यांनी म्हटले.
अंजुम चोप्रा यांनी बीसीसीआयला विचारले प्रश्न
भारतातील सन्माननीय महिला क्रिकेटपटू असलेल्या आणि सध्या समालोचक म्हणून काम पाहणाऱ्या अंजुम चोप्रा यांनी महिला क्रिकेटविषयी आपली मते मांडली. त्या म्हणाल्या, “भारताचा पुरुष संघ सध्या अनेक मालिकांमध्ये सहभागी होत आहे. बीसीसीआयने आगामी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीची देखील घोषणा केली. परंतु, महिला क्रिकेटबाबत बीसीसीआयची योजना काय आहेत, याबाबत कोणतीही माहीत नाही. कदाचित बीसीसीआय गंभीरपणे एखादी योजना बनवत असेल. मात्र, त्याची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहचत नाही. आम्हाला देखील ही माहिती समाजमाध्यमांद्वारेच मिळते.”
महिला क्रिकेटसाठी काहीतरी करावे लागेल
नुकत्याच बांगलादेशमधील एका स्थानिक स्पर्धेत समालोचन करून आलेल्या चोप्रा यांनी पुढे म्हटले, “बीसीसीआय केवळ पुरुष किंवा महिला क्रिकेटपटूंचे बोर्ड नाहीतर, महिला आणि पुरुष अशा दोघांचे क्रिकेट बोर्ड आहे. कोविड-१९ मुळे महिला संघाचा इंग्लंड दौरा रद्द झाला. दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज दौऱ्यांबाबतही साशंकता निर्माण झाली आहे. विश्वचषक देखील पुढे ढकलले गेल्याने महिला क्रिकेटसाठी काहीतरी करावे लागेल.”
भारतीय महिला क्रिकेट संघाने या वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या टी२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यानंतर एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळला नाही. आयपीएल दरम्यान शारजात झालेल्या वुमेन्स टी२० चॅलेंजमध्ये भारतीय महिलांनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेत अवघे चार सामने खेळले गेलेले.
भारताच्या कर्णधार राहिल्या आहेत अंजुम
अंजुम यांनी १९९५ ते २०१२ या कालावधीत भारतीय महिला क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. २००२ मध्ये त्यांनी भारताचे नेतृत्व देखील केले होते. २००५ महिला विश्वचषकाची अंतिम फेरी घटना गाठणाऱ्या संघासाठी त्यांनी सर्वाधिक धावा काढल्या होत्या. सध्या त्या प्रसिद्ध समालोचक आहेत.
महत्वाच्या बातम्या:
– नवी आयसीसी क्रमवारी जाहीर; मैदानापाठोपाठ इथेही भारतीयांच्या उडाल्या दांड्या
– पाकिस्तानचा सलग दुसऱ्या टी-२० सामन्यात पराभव, न्यूझीलंडची मालिकेत विजयी आघाडी
– विलियम्सनचा अपर कट पाहून व्हाल अवाक; व्हिडिओ होतोय व्हायरल