आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्सची सुरुवात अत्यंत खराब झालेली आहे. मुंबई संघाला पहिल्या तीनही सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. गुजरात टायटन्स, सनरायजर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स या तिन्ही संघाकडून मुंबई इंडियन्सला पराभव पत्करावा लागलाय. या पराभवानंतर संघाचा नवीन कर्णधार हार्दिक पंड्या याच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ( Unhappy Rohit Sharma to quit Mumbai Indians as Hardik Pandya given ultimatum by owners Reports )
मुंबई इंडियन्सने 15 डिसेंबर 2023 रोजी रोहित शर्मा याला कर्णधार पदावरुन काढून हार्दिक पंड्या याच्या हाती नेतृत्वाची धुरा दिली. परंतू नवीन हंगामाच्या पहिल्या तीनही सामन्यातील मुंबईच्या पराभवानंतर संघ व्यवस्थापनाच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दरम्यान संघ मालकीण नीता अंबानी यांनी रोहित शर्मा याला पुन्हा एकदा कर्णधारपदाची ऑफर दिली असल्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसेच यात रोहित शर्मा याने ही ऑफर नाकारत सडेतोड उत्तर दिल्याचेही वृत्त पसरत आहे. परंतू तशी अधिकृत कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही.
काय आहे व्हायरल पोस्ट?
सोशल मीडियावर मुंबईच्या कर्णधार पदाबाबत प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यात हे वृत्त व्हायरल होते आहे. त्यानुसार, “नीता अंबानी यांनी रोहित शर्मा याला पुन्हा एकदा मुंबई संघाचे कर्णधार पद स्विकारण्याची ऑफर दिली होती. परंतू रोहितने त्याला स्पष्टपणे नकार दिला. तसेच आयपीएलचा हा हंगाम संपल्यावर मुंबईकडून खेळणार नसल्याचे नीता अंबानी यांना सांगितले,” असे वृत्त सोशलवर पसरत आहे.
🚨 Breaking News 🚨
Yesterday, Rohit Sharma was offered the captaincy of Mumbai Indians, but he rejected it. Also he clearly mentioned that he will not play for MI from next season. [Source: Link in reply]
“Nothing over self-respect.” 🫡 pic.twitter.com/mxUtD4jYvu
— Selfless⁴⁵ (@SelflessCricket) April 4, 2024
JUST IN 🚨🚨🚨
Rohit Sharma and Jasprit Bumrah all set to leave Mumbai Indians after IPL 2024. As per report Suryakumar Yadav is also in talks to leave Mumbai Indians.
Source ~ TOI . pic.twitter.com/1yz6MdrUmC
— Shubham 𝕏 (@DankShubhum) April 4, 2024
त्यामुळे आयपीएल 2025 मध्ये रोहित शर्मा नवीन संघाकडून खेळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परंतू ही व्हायरल माहिती असल्याने अधिकृतरित्या काहीही समोर आलेले नाही. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाचा पुढील सामना 7 एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल्स संघासोबत होणार आहे. या सामन्यात रोहित किती धावा करणार याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.
अधिक वाचा –
– पंजाबकडून हार पत्करलेल्या गुजरात संघाला मोठा धक्का, ‘हा’ प्रमुख खेळाडू पुढील सामन्यांसाठी उपलब्ध नसणार
– ‘कुणीच बोली लावली नाही अन् पंजाब म्हटलं चुकून घेतलाय’, पंजाब किंग्जच्या शशांक सिंगची आयपीएल स्टोरी आहे एकदम भारी
– मुंबई इंडियन्सच्या करोडो चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! संघाचा तारणहार पुन्हा परतणार, सुर्याच्या कमबॅकचा दिवस ठरला?