उत्तराखंड क्रिकेट असोसिएशन (सीएयू) पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. वसीम जाफर राजीनामा प्रकरणानंतर यावेळी त्यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) आदेशाला दुर्लक्षित करत एका निलंबित क्रिकेटपटूला विजय हजारे ट्रॉफी २०२१मध्ये खेळण्यासाठी पाठवले आहे. परंतु सीएयूच्या सदस्यांचे म्हणणे आहे की, त्यांना यासंदर्भात कसलीही कल्पना नाही.
खोटे वय सांगून बीसीसीआयची फसवणूक केल्याने हल्द्वानी नामक एका क्रिकेटपटूला २०१८ ते मार्च २०२१ पर्यंत निलंबित करण्यात आले आहे. तरीही सीएयूने सध्या चालू असलेल्या विजय हजारे ट्रॉफीसाठी त्या खेळाडूला संघासोबत चेन्नईला पाठवले होते. मात्र त्याला एकही सामना खेळू न देता परत पाठवण्यात आले. एवढेच नव्हे तर, उत्तराखंड संघाचे माजी प्रशिक्षक वसीम जाफर यांच्या २२ सदस्यीय संघातही त्या खेळाडूला संधी देण्यात आली होती.
सीएयूच्या कोषाध्यक्ष पृथ्वी सिंग नेगी यांनी यासंदर्भात वक्तव्य केले आहे. या मुद्द्याला उचलून धरण्यात येईल आणि एवढ्या मोठ्या निष्काळजीपणाची नक्कीच तपासणी केली जाणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
नेगी यांनी सांगितले की, “उत्तराखंड क्रिकेट असोसिएशनच्या इतर सदस्यांचा सल्ला न घेण्यात येणे, ही आश्चर्याची बाब आहे. यापुर्वीही सीएयूच्या सदस्यांनी या गोष्टीचा विरोध केला आहे. त्यांचे म्हणणे आहे की, सीएयूमध्ये ‘वन मॅन आर्मी शो’ चालू आहे. अर्थात फक्त सचिवांच्या मनानुसार येथे सर्व कामे चालतात. ना निवडकर्त्यांना काही विचारले जाते, ना प्रशिक्षकांचे विचार ऐकून घेतले जातात. फक्त एकच व्यक्ती पूर्ण असोसिएशन चालवत आहे.”
“मात्र या व्यापाला त्रासून आता असोसिएशनचे सदस्य पुढाकार घेऊ लागले आहेत. याआधी प्रशिक्षक जाफर यांनी अशाचप्रकारचे आरोप करत त्यांच्या पदाचा राजीनामा दिला होता,” असे शेवटी ते बोलताना म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या-
आखिर वो दिन आ ही गया! सुर्यकुमारची टीम इंडियात निवड झाल्यानंतर ट्विटरवर मीम्सचा पाऊस
जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम असलेल्या मोटेरा स्टेडियमची काय आहे खासियत, घ्या जाणून