१९९७ साली टोरंटो येथे सहारा चषकात भारत आणि पाकिस्तान संघात सामना पार पडला होता. विनोद कांबळीही त्या सामन्यात भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत होता. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानचा फलंदाज इंझमाम उल हकने स्टेडिअममधील प्रेक्षकावर बॅट उगारली होती. त्यामुळे तो चांगलाच वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. त्या घटनेबाबत कांबळीने आता मौन सोडले आहे.
त्या घटनेला उजाळा देत कांबळीने म्हटले, “आम्ही ड्रेसिंग रूममध्ये बसलो होतो. आम्ही अचानक इंझमामने बॅट मागविल्याचा इशारा पाहिला. ड्रेसिंग रूममधून एक व्यक्ती त्याच्याकडे बॅट घेऊन गेला. आम्हाला प्रश्न पडला होता की हा व्यक्ती इंझमामसाठी बॅट घेऊन का जात आहे. त्यानंतर ती घटना घडली, ती नक्कीच आश्चर्यचकित करणारी होती. त्यानंतर माध्यमांमध्ये वृत्त आले होते की इंझमामला प्रेक्षकांपैकी कोणीतरी ‘खराब आलू’ म्हटले होते.”
नुकतेच काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचा माजी खेळाडू वकार युनूसने म्हटले होते की, इंझमामने हे सर्व भारतीय संघाचा तत्कालीन कर्णधार मोहम्मद अझरूद्दीनसाठी असे केले होते. तो पुढे म्हणाला होता की, कोणीतरी त्याला ‘आलू’ म्हटले होते. युनूसनुसार, खरंतर इंझमानने जे काही केले, ते त्याला ‘आलू’ म्हटल्यामुळे नाही तर अझरूद्दीनच्या पत्नीबद्दल वाईट वक्तव्य केल्यामुळे केले होते. युनूस पुढे म्हणाला होता की, इंझमाम आणि अझरूद्दीनमध्ये चांगली मैत्री होती.
महत्त्वाच्या बातम्या –
-असा एक दूर्दैवी क्रिकेटपटू जो आज असता एक महान अष्टपैलू, पण तेव्हा…
-अनिल कुंबळेनी ‘मंकीगेट’ प्रकरणावर केले मोठे भाष्य; म्हणाला…
-वाढदिवस विशेष : आपले रक्त देऊन भारतीय कर्णधाराचा जीव वाचवणारा वेस्ट इंडिजचा दिलदार दिग्गज