भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) काही दिवसांपूर्वीच एक महत्त्वाचा निर्णय घेत भारताच्या वरिष्ठ संघाची संपूर्ण निवडसमिती बरखास्त केली होती. त्यानंतर नव्या निवडसमितीसाठी अर्ज मागवले होते. या निमंत्रणाला चांगला प्रतिसाद भेटला असून, तब्बल 60 माजी भारतीय क्रिकेटपटूंनी 5 जागांसाठी अर्ज केला आहे. विशेष म्हणजे यामध्ये काही दिवसांपूर्वी चर्चेत आलेला भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी याचे देखील नाव आहे.
टी20 विश्वचषकातील खराब कामगिरीचा ठपका ठेवत बीसीसीआयने भारतीय संघाची निवडसमिती बरखास्त करण्याचा निर्णय घेतलेला. त्यानंतर नव्या निवड समिती सदस्य पदांसाठी अर्ज मागवण्याची अंतिम तारीख 28 नोव्हेंबर होती. अर्ज मागवण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत तब्बल 60 अर्ज प्राप्त झाल्याचे सांगण्यात येतेय. यामध्ये विनोद कांबळी याचे नाव सर्वात चर्चेत आहे.
काही दिवसांपूर्वी विनोद कांबळी यांनी सोशल मीडियाद्वारे असे सांगितले होते की, सध्या आपण जगण्यासाठी संघर्ष करत असून, आपण बेरोजगार आहे. बीसीसीआयकडून मिळत असलेल्या 30,000 रुपयांवर आपण आपल्या कुटुंबात चालवत असल्याचे त्याने म्हटलेले. त्यानंतर त्याला एका उद्योजकाने नोकरीची ऑफर दिली होती. तत्पूर्वी, विनोद सचिन तेंडुलकर व मिडलसेक्स क्लब यांच्या क्रिकेट अकादमी प्रशिक्षकाचे काम करत होता. मात्र, शारीरिक व्याधीमुळे त्याने ती नोकरी सोडण्याचा निर्णय घेतलेला.
विनोद कांबळी नव्या निवड समिती सदस्यपदासाठी ठेवलेल्या सर्व अटींची पूर्तता करत आहे. त्याने भारतीय संघासाठी 10 वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना 17 कसोटी व 104 वनडे सामने खेळले आहेत. तसेच, त्याला प्रशिक्षणाचा देखील अनुभव आहे. नव्या निवड समितीसाठी लवकरच मुलाखती होणार असून, यामध्ये कांबळी याची वर्णी लागते का, हे पाहणे रंजक ठरेल.
(Vinod Kambli Has Applied For The Post Of BCCI Selection Committee Member)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अरे, हे काय बोलून गेला इंग्लंडचा कोच! मॅक्युलम म्हणाला, ‘पाकिस्तानविरुद्ध हरलो तरी चालेल…’
विराट कोहली विरुद्ध तू असा सामना झाला तर कोण जिंकेल? सूर्या म्हणाला, ‘अर्थातच…’