गुरुवारपासून (5 ऑक्टोबर) भारतात वनडे क्रिकेट विश्वचषकाला सुरुवात झाली आहे. जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्पर्धेत यावेळी दहा संघ सहभागी झाले आहेत. तब्बल दीड महिने चालणाऱ्या या स्पर्धेत कोणता संघ बाजी मारतो याकडे सर्वांचे लक्ष असेल. स्पर्धेचा यजमान भारतीय संघ विजेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. असे असले तरी भारताच्या विजयाची प्रार्थना सर्व चाहते करताना दिसत आहेत. बारा वर्षानंतर भारताने विश्वचषक जिंकावा यासाठी काही चाहते आता वेगवेगळे उपक्रम करताना दिसतायेत.
भारतीय संघाने आपला अखेरचा विश्वचषक 2011 मध्ये जिंकला होता. त्यानंतर सलग दोन विश्वचषकात भारताला उपांत्य फेरीत पराभूत व्हावे लागले. यावेळी भारताने विश्वचषक जिंकावा यासाठी पश्चिम बंगालमधील काही चाहत्यांनी एक स्तुत्य उपक्रम सुरू केला. विराट कोहली याचे चाहते असलेल्या या तरुणांनी विविध ठिकाणी गरजूंना कपड्यांचे वाटप केले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
On the occasion of Durga Puja, on behalf of Virat Kohli West Bengal Help Foundation, some moments of distribution of clothes to poor children in Jhargram district were highlighted. #VKWBHF@imVkohli #ViratKohli #Viratians @ffspari @ImTanujSingh @BluntIndianGal @CricCrazyJohns pic.twitter.com/HJyzhmw94c
— VIRAT KOHLI WEST BENGAL HELP FOUNDATION (@vkwbhf) October 6, 2023
आगामी नवरात्र व विश्वचषक असा दुहेरी योगायोग साधत या तरुणांनी हा उपक्रम हाती घेतला. पश्चिम बंगालमध्ये नवरात्र उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो. यंदा विराट कोहली हा आपला सलग चौथा वनडे विश्वचषक खेळत आहे. कदाचित हा त्याचा अखेरचा विश्वचषक असू शकतो. तसेच मायदेशात हा विश्वचषक होत असल्याने भारतीय संघाच्या विजयाची अपेक्षा सर्वजण व्यक्त करत आहेत.
या विश्वचषकात भारतीय संघ आपल्या मोहिमेची सुरुवात 8 ऑक्टोबरपासून भारतीय संघाला आपला पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळायचा आहे. यावेळी भारतीय संघाचे नेतृत्व रोहित शर्मा करत असून, उपकर्णधार हार्दिक पंड्या असेल.
विश्वचषकासाठी भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, ईशान किशन, सूर्यकुमार यादव.
(Virat Kohli Fans Distribute Cloths For Needy People For India World Cup Win Wish)
महत्वाच्या बातम्या –
दुसऱ्या सेमीफायनलमध्ये पाकिस्तानला चिरडत अफगाणिस्तानचा जबरदस्त विजय, अंतिम सामन्यात ऋतुराजसेनेशी भिडणार
विश्वचषकाच्या दुसऱ्या सामन्यात नेदरलँडने जिंकला टॉस; बाबर म्हणाला, ‘आम्ही आज 300…’